विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळाल्यावर ममता बॅनर्जी यांना राष्ट्रीय पातळीवर नेतृत्वाची स्वप्ने पडत आहेत. मात्र, प्रादेशिक नेत्यांना देश स्वीकारत नाही. आंध्र प्रदेशात एन. टी. रामाराव आणि हरियाणात देवीलाल यांनीही मोठा विजय मिळविला होता.Why appreciate Mamata? N. T. Rama Rao and Devi Lal had also won, but the country did not accept the regional leaders
मात्र, त्यांना राष्ट्रीय पातळीवर स्वीकारले गेले नाही, असा दावा जनता दलाचे (संयुक्त) नेते के. सी. त्यागी यांनी केला आहे.दीर्घकाळपासून राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात आणि दिल्लीमध्ये असलेले त्यागी म्हणाले, ममता बॅनर्जी यांच्या विजयामुळे अनेक जण हुरळून गेले आहेत.
मात्र, प्रादेशिक पातळीवर मोठा विजय मिळविल्याची अनेक उदाहरणे आहेत. एन. टी. रामाराव, देविलाल आणि शरद पवार यांच्यासारख्या प्रादेशिक नेत्यांकडून राष्ट्रीय पातळीवर आघाडी करण्याचा प्रयत्न केला गेला होता.
मात्र, देशातील जनता त्यांना स्वीकारत नाही हे आत्तापर्यंत सिध्द झाले आहे. त्यामुळे ममतांची गतही तशीच होणार आहे. कारण प्रादेशिक पक्षांची ताकद तेवढी नसते. त्यामुळे ममतांसाठी दिल्ली दूरच असणार आहे.
कॉँग्रेस आणि डावे पक्ष ममतांच्या विजयाने आनंदी झाल्यासारखे वाटत आहे. पण त्यांनी लक्षात घ्यावे की ममता त्यांना हरवून नव्हे तर नेस्तनाबूत करून पश्चिम बंगालमध्ये विजयी झाल्या आहेत, असा टोलाही त्यागी यांनी लगावला.
Why appreciate Mamata? N. T. Rama Rao and Devi Lal had also won, but the country did not accept the regional leaders
महत्त्वाच्या बातम्या
- जगन्नाथाची भूमी पूरीमध्ये युरोप, अमेरिकेइतकेच शुध्द पाणी, अडीच लाख लोकसंख्येला नळाने शुध्द पाणीपुरवठा
- आप पंजाबमध्ये स्वबळावरच लढणार, कोणत्याही राजकीय पक्षाशी युती करणार नाही
- बी. एस. येडियुरप्पा यांच्या राजीनाम्यामुळे व्यथित होऊन समर्थकाची आत्महत्या
- सोनियांसाठी “नवे डॉ. मनमोहन सिंग” बनण्याचा ममतांचा प्रयत्न…??
- मुंबई महानगर प्रदेशात बीएस -३ वाहनांना पूर्ण बंदी घाला, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या समितीची शिफारस