• Download App
    जुलैमध्ये घाऊक महागाई दर १३.९३% राहिला, खाद्यपदार्थांच्या किमतीत घट, घाऊक महागाई नीचांकी पातळीवर|Wholesale inflation rate at 13.93% in July, food prices down, wholesale inflation at record low

    जुलैमध्ये घाऊक महागाई दर १३.९३% राहिला, खाद्यपदार्थांच्या किमतीत घट, घाऊक महागाई नीचांकी पातळीवर

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : महागाईवर लगाम लावण्यासाठी सरकार आणि रिझर्व्ह बँकेचे प्रयत्न काहीसे यशस्वी होताना दिसत आहेत. किरकोळ महागाईनंतर आता घाऊक महागाईही घटली आहे. मंगळवारी जारी केलेल्या सरकारी आकडेवारीनुसार जुलैमध्ये घाऊक महागाई दर १३.९३% राहिला. हा जूनमध्ये १५.१८% होता.Wholesale inflation rate at 13.93% in July, food prices down, wholesale inflation at record low

    दुसरीकडे, या वर्षी मेमध्ये हा १५.८८% च्या विक्रमी उंचीवर होता. गेल्या तीन महिन्यांपासून सलग घाऊक महागाई दर १५% वर राहिला. तो सलग १६ महिन्यांपासून दोन आकड्यात आहे. महागाई कमी होण्याचे मोठे कारण खाद्यसामग्री आणि मॅन्युफॅक्चरिंग उत्पादनांच्या किमतीतील घट आहे.



    खाद्य महागाई जुलैमध्ये १०.७७% नोंदली, ही याआधी म्हणजे जूनमध्ये १४.३९% होती. मात्र, इंधन आणि विजेचा महागाई दर जूनच्या ४०.३८% वरून वाढून ४३.७५% राहिला. मॅन्युफॅक्चर उत्पादनांमध्ये महागाई ८.१६% आणि तेलबियांत -४.०६% राहिली.

    अमूल, मदर डेअरीची २ रुपये प्रति लिटर वाढ

    अमूल आणि मदर डेअरीने दुधाच्या किमती 2 रु. प्रतिलिटरने वाढवल्या आहेत. नव्या किमती बुधवारपासून लागू होतील. गुजरात सह.दूध विपणन संस्थेनुसार, अमूलचे सर्व दूध ४% महागले आहे. यानंतर मदर डेअरीनेही किमतीत २ रु. लिटर वाढ केली. संस्थेनुसार, शेतकऱ्यांच्या देयकाच्या तुलनेत प्रतिलिटर २ रु. वाढ कमी आहे. दोन्ही कंपन्यांनी या वर्षी दुसऱ्यांदा दरवाढ केली आहे.

    Wholesale inflation rate at 13.93% in July, food prices down, wholesale inflation at record low

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Vikram Bhatt : दिग्दर्शक विक्रम भट्ट यांना दिलासा नाही, पत्नी तुरुंगातून बाहेर येईल; सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 18 तारखेला; 30 कोटींचे फसवणूक प्रकरण

    Tamil Nadu : तामिळनाडूमध्ये 1.31 कोटी महिलांच्या खात्यात ₹5,000 ट्रान्सफर; मुख्यमंत्री स्टालिन म्हणाले- पुन्हा सरकार आल्यास दरमहा ₹2,000 देणार

    Rahul Gandhi : राहुल गांधी शेतकरी संघटनांच्या नेत्यांना भेटले; म्हणाले- शेतकरी हिताशी कोणतीही तडजोड नाही, भारत-अमेरिका व्यापार करार आंदोलनावर चर्चा