विशेष प्रतिनिधी
पणजी : गोव्याचे माजी (कै.) मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रीकर हे विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी करत आहेत. त्यांनी भाजपकडे तिकीट मागितले आहे. परंतु, त्यांना भाजप तिकीट देणार की भाजपने तिकीट नाकारल्यानंतर शिवसेनेच्या तिकिटावर ते उभे राहणार याची राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे. Who will give ticket to Utpal Parrikar in Goa, BJP or Shiv Sena?
मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर पणजी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक झाली त्या निवडणुकीत उत्पल पर्रीकर यांनी भाजपने तिकीट मागितले होते. परंतु, भाजपने त्यांना तिकीट दिले नाही. त्यांच्या ऐवजी सिद्धार्थ कुंकोळीकर यांना तिकीट दिले. परंतु ते मनोहर पर्रीकर यांच्या बालेकिल्ल्यात पराभूत झाले. काँग्रेसचे बाबुशा मोन्सेरात यांनी त्यांना हरवले. आता बाबुशा मोन्सेरात हे भाजपच्या बाजूने उभे राहिले आहेत.
उत्पल पर्रीकर यांनी पुन्हा एकदा भाजपकडे तिकीट मागितले आहे. परंतु भाजपने तिकीट नाकारले तरी धाडसी निर्णय घेऊन निवडणुकीत नशीब आजमावण्याचा निर्णय उत्पल पर्रीकर यांनी घेतला आहे. कदाचित हिंदुत्ववादी पक्ष म्हणून शिवसेना त्यांना तिकीट देण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी याचे सूतोवाच केले आहे. उत्पल पर्रीकर यांनी धाडसाने निर्णय घेतला तर शिवसेना देखील त्यांना तिकीट देऊ शकते, असे ते म्हणाले आहेत. याआधी दादरा नगर हवेली मध्ये कलाबेन डेलकर यांनी भाजपचे तिकीट मागितले होते. परंतु, भाजपने धोरणात्मक निर्णय म्हणून खासदार मोहन डेलकर यांच्या कुटुंबातील कोणालाही तिकीट द्यायचे नाही हा निर्णय घेतला होता. त्यामुळे भाजपने कलाबेन डेलकर यांना तिकीट नाकारले होते. कलाबेन डेलकर या शिवसेनेच्या तिकिटावर दादरा नगर हवेली मधून खासदार झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर उत्पल पर्रीकर कोणता निर्णय घेतात याकडे गोव्यातल्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Who will give ticket to Utpal Parrikar in Goa, BJP or Shiv Sena?
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबई पोलिसांवर कोरोनाचे गडद सावट, ४८ तासांत २ पोलिसांचा मृत्यू, ८ दिवसांत ५२३ जण बाधित
- पंतप्रधानांच्या सुरक्षेत घोडचूक : सर्वोच्च न्यायालय म्हणाले- तपासासाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करा
- YOGI ADITYANATH : हिंदूचं घर जळणार तेव्हा मुसलमानचं घर थोडी सुरक्षित राहणार योगी आदित्यनाथ