• Download App
    कोण होता अयमान अल-जवाहिरी? : पेशाने सर्जन, सौदीत बिन लादेनशी पहिली भेट... नंतर असा झाला अल-कायदाचा प्रमुख|Who was Ayman al-Zawahiri? Surgeon by profession, first meeting with Saud bin Laden...later to become head of al-Qaeda

    कोण होता अयमान अल-जवाहिरी? : पेशाने सर्जन, सौदीत बिन लादेनशी पहिली भेट… नंतर असा झाला अल-कायदाचा प्रमुख

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : अल कायदाचा प्रमुख अयमान अल-जवाहिरी याला अमेरिकेने ठार केले आहे. सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी (सीआयए) ने अफगाणिस्तानमध्ये ड्रोन हल्ल्यात त्याचा खात्मा केला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी जवाहिरीच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे.Who was Ayman al-Zawahiri? Surgeon by profession, first meeting with Saud bin Laden…later to become head of al-Qaeda

    11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेत झालेल्या हल्ल्यात जवाहिरीने चार विमानांचे अपहरण करण्यात मदत केली होती. यामध्ये 2 विमाने वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या (WTC) दोन्ही टॉवरवर आदळली. तर तिसरे विमान अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाच्या म्हणजेच पेंटागॉनला धडकले. चौथे विमान शँकविले येथील शेतात कोसळले. या दहशतवादी घटनेत सुमारे तीन हजार लोक मारले गेले.



    संपन्न इजिप्शियन कुटुंबात जन्म

    अल जवाहिरीचा जन्म 19 जून 1951 रोजी एका संपन्न इजिप्शियन कुटुंबात झाला. तो व्यवसायाने सर्जन होता. वयाच्या 14 व्या वर्षी तो मुस्लिम ब्रदरहूडचा सदस्य झाला. 1978 मध्ये कैरो विद्यापीठातील तत्त्वज्ञानाची विद्यार्थिनी अजा नोवारीशी त्याने लग्न केले. त्याच्या लग्नात पुरुषांना स्त्रियांपासून वेगळे बसवण्यात आले होते. फोटोग्राफरलाही दूर ठेवण्यात आले. एवढेच काय, अगदी हसण्यावर आणि विनोदांवरही बंदी होती.

    EIJ ची केली स्थापना

    जवाहिरीने इजिप्शियन इस्लामिक जिहाद (EIJ) स्थापन केला. 1970 च्या दशकात इजिप्तमधील धर्मनिरपेक्ष राजवटीला विरोध करणारी ही लढाऊ संघटना होती. त्याला इजिप्तमध्ये इस्लामिक सरकारचे वर्चस्व हवे होते. 1981 मध्ये इजिप्तचे अध्यक्ष अन्वर सादात यांच्या हत्येनंतर अटक करण्यात आलेल्या आणि छळ करण्यात आलेल्या शेकडो लोकांमध्ये जवाहिरीचा समावेश होता. 3 वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर तो इजिप्त सोडून सौदी अरेबियात आला.

    पेशावरमध्ये लादेनशी झाली भेट

    सौदीत आल्यानंतर त्यांनी वैद्यकीय प्रॅक्टिस करण्यास त्याने सुरुवात केली. अल-जवाहिरीने अल-कायदा प्रमुख ओसामा बिन लादेनची सौदी अरेबियात भेट घेतली. 1985 मध्ये बिन लादेन पेशावर, पाकिस्तानमध्ये अल कायदाला प्रोत्साहन देण्यासाठी गेला होता. यावेळी अल जवाहिरीही तेथे होता. येथून दोन दहशतवाद्यांचे नाते घट्ट होऊ लागले.

    यानंतर 2001 मध्ये अल-जवाहिरीने ईआयजेचे अल-कायदामध्ये विलीनीकरण केले. यानंतर दोघांनी मिळून अत्यंत क्रूर कट रचले. अमेरिकेच्या हल्ल्यात ओसामा बिन लादेनचा मृत्यू झाल्यानंतर जवाहिरीने संघटनेची कमान हाती घेतली होती. 2011 मध्ये तो अल कायदाचा प्रमुख बनला होता.

    अल जिवाहिरीचा कसा झाला खात्मा?

    सीएनएनच्या रिपोर्टनुसार, जवाहिरीने काबूलमध्ये आश्रय घेतला होता. ड्रोन हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. या हल्ल्यासाठी अमेरिकेने दोन हेलफायर क्षेपणास्त्रांचा वापर केला. शनिवारी रात्री ९.४८ वाजता ड्रोन हल्ला करण्यात आला. जवाहिरीवरील हल्ल्यापूर्वी बायडेन यांनी अनेक आठवडे आपल्या मंत्रिमंडळ आणि सल्लागारांसोबत बैठका घेतल्याचे सांगण्यात येत आहे. एवढेच नाही तर विशेष म्हणजे या हल्ल्याच्या वेळी एकही अमेरिकन काबूलमध्ये उपस्थित नव्हता. त्याचबरोबर या हल्ल्यात त्यांच्या कुटुंबाला लक्ष्य करण्यात आले नसल्याचे अमेरिकेने स्पष्टपणे सांगितले आहे. अमेरिकेने तालिबानलाही या मिशनची माहिती दिली नव्हती.

    Who was Ayman al-Zawahiri? Surgeon by profession, first meeting with Saud bin Laden…later to become head of al-Qaeda

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य