• Download App
    आयव्हरमेक्टिनचा सरसकट वापर न करण्याचा जागतिक आरोग्य संघटनेचा दुसऱ्यांदा इशारा।WHO warns regarding some drug use

    आयव्हरमेक्टिनचा सरसकट वापर न करण्याचा जागतिक आरोग्य संघटनेचा दुसऱ्यांदा इशारा

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेने आयव्हरमेक्टिन या औषधाच्या वापरावरून खबरदारीचा इशारा दिला आहे. मागील दोन महिन्यांमध्ये आरोग्य संघटनेने सलग दुसऱ्यांदा या औषधाच्या वापराबाबत इशारा दिला आहे. या औषधाच्या सेवनामुळे मृत्यूदर कमी होतो किंवा रुग्णांचे रुग्णालयांत दाखल होण्याचे प्रमाण देखील कमी होते हे दर्शविणारे फार कमी पुरावे हाती आल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. WHO warns regarding some drug use



    एखाद्या औषधाचा वापर केला जात असताना त्याची सुरक्षितता आणि परिणामकारकता या दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. हे औषध फक्त क्लिनिकल ट्रायल्समध्ये वापरले जायला हवे, या औषधाचा सरसकट वापर केला जाऊ नये, असे आरोग्य संघटनेच्या मुख्य संशोधक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटले आहे.

    विशेष म्हणजे आयव्हरमेक्टिनची उत्पादक कंपनी असणाऱ्या एमएसडीने देखील काहीसा अशाच प्रकारचा इशारा दिला आहे. या औषधाच्या वापरानंतर आमच्या हाती येत असलेल्या सर्व निष्कर्षांचा आम्ही काळजीपूर्वक अभ्यास करत आहोत, असे उत्पादक कंपनीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

    WHO warns regarding some drug use

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही