• Download App
    दररोज 5 ग्रॅम मीठ शरीराला पुरेसे ; जागतिक आरोग्य संघटनेची सूचना |WHO releases guidlines for eating Sodium aka salt per day

    दररोज 5 ग्रॅम मीठ शरीराला पुरेसे ; जागतिक आरोग्य संघटनेची सूचना

    वृत्तसंस्था

    मुंबई : अन्नाला मिठाशिवाय चव लागत नाही. मात्र, अनेक लोक मीठ जास्त खातात. जास्त मीठ खाणे हे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे आरोग्य तज्ज्ञ मीठ कमीच खाण्याचा सल्ला देतात. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने रोज किती मीठ खावे याचे मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. WHO releases guidlines for eating Sodium aka salt per day

    जागतिक आरोग्य संघटनेनेही( WHO) मीठ खाण्याविषयी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्यांच्या मते एका दिवसात 5 ग्रॅम मीठ शरीराला पुरेसे आहे.



    हृदय रोग आणि स्ट्रोकचा धोका

    मानवी शरीराला सोडियम आणि पोटॅशियम दोन्हीची आवश्यकता आहेत. जास्त मीठ खाल्ल्याने शरीरातील जास्त सोडियम बाहेर पडते आणि पोटॅशियम आणि सोडियमचे प्रमाण असमतोल होते.

    सोडियमच्या अधिकतेमुळे हाडे कमकुवत होतात आणि उच्च बीपी होते. यामुळे ब्रेन स्ट्रोक, हृदयाशी संबंधित आजारांचा धोका तसेच मूत्रपिंडावर त्याचा वाईट परिणाम होण्याचा धोका आहे.

    5 ग्रॅम मीठ शरीराला पुरेसे

    एखाद्या व्यक्तीच्या शरीरात सोडियमची आवश्यकता पाच ग्रॅम मीठाने पूर्ण होते. परंतु आपल्यापैकी बरेच जण दिवसभरात सरासरी 9 ते 12 ग्रॅम मीठ खातात.

    WHO च्या अभ्यासानुसार सर्वाधिक प्रोसेस्ड फूड, पॅकेज्ड फूड, डेअरी आणि मांसमध्ये मीठ आढळले. मीठ समतोल प्रमाणात खाल्ल्यास अडीच दशलक्ष मृत्यूंना आळा बसेल.

    कोणत्या आहारात सोडियम पुरेसे आहे?

    100 ग्रॅम बटाटा चिप्समध्ये 100 ग्रॅमपेक्षा जास्त सोडियम असू नये. तसेच प्रक्रिया केलेल्या मांसमध्ये 30 मिलीग्राम पर्यंत सोडियम पुरेसे आहे. मीठाचे सेवन शरीरासाठी देखील महत्वाचे आहे.

    हे शरीर हायड्रेट करण्याचे कार्य करते. सिस्टिक फायब्रोसिसची लक्षणे सुधारते. थायरॉईड ग्रंथीचे कार्य योग्य प्रकारे होते. हे कमी रक्तदाब (बीपी) असलेल्या रूग्णांसाठीही फायदेशीर आहे. पण आवश्यकतेनुसार ते खावे. जास्त मीठ आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

    WHO releases guidlines for eating Sodium aka salt per day

    महत्वाच्या  बातम्या 

     

    Related posts

    Delhi Blast, : दिल्ली स्फोटप्रकरणी अतिरेकी उमरच्या आणखी एका साथीदाराला अटक; ड्रोन-रॉकेट बनवले, तांत्रिक मदत पुरवली

    CJI BR Gavai : सरन्यायाधीश बी.आर. गवई यांचे आरक्षणावर मोठे वक्तव्य, अनुसूचित जातींतही (SC)लागू व्हावे ‘क्रीमी लेयर’

    Nitish Kumar : नितीश कुमार 20 नोव्हेंबरला गांधी मैदानावर शपथ घेणार; BJP आणि JDU मध्ये प्रत्येकी 16 मंत्री