• Download App
    दिल्ली मद्य घोटाळ्याचा सूत्रधार कोण? संबित पात्रा म्हणाले- CBIला हेच जाणून घ्यायचे आहे|Who is the mastermind of Delhi liquor scam? Sambit Patra said – This is what the CBI wants to know

    दिल्ली मद्य घोटाळ्याचा सूत्रधार कोण? संबित पात्रा म्हणाले- CBIला हेच जाणून घ्यायचे आहे

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : दिल्ली मद्य घोटाळाप्रकरणी भाजपने पुन्हा एकदा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना घेराव घालण्यास सुरुवात केली आहे. याप्रकरणी सीबीआय आता लवकरच केजरीवाल यांची चौकशी करणार आहे. तत्पूर्वी भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केजरीवाल यांना धारेवर धरले. मनीष सिसोदिया यांचे हातमोजे घालून केजरीवाल यांनी भ्रष्टाचार केला आहे, असा टोला त्यांनी लगावला.Who is the mastermind of Delhi liquor scam? Sambit Patra said – This is what the CBI wants to know

    संबित पात्रा पुढे म्हणाले की, सीबीआयला हे जाणून घ्यायचे आहे की दिल्लीत झालेल्या मद्य घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार कोण आहे? सीबीआय वस्तुस्थिती समोर आणण्याचा प्रयत्न करेल. हातमोजे घालून कोण भ्रष्टाचार करत होते? केजरीवाल यांनीही विजय नायरचा वापर केल्याचे ते म्हणाले. अरविंद केजरीवाल यांनी मद्य धोरणात घोटाळा केला आहे, त्यामुळे आता त्यांनाही त्याची शिक्षा होणार आहे.



    ‘सर्व भ्रष्टाचारी एक झाले’

    संबित पात्रा यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी निर्माण होत असलेल्या विरोधी एकजुटीचीही खिल्ली उडवली. ते म्हणाले की, केजरीवाल, सोनिया गांधी, राहुल गांधी असे सर्व भ्रष्ट लोक एक झाले आहेत. खरगे केजरीवाल यांनाही फोन करतात. अरविंद केजरीवाल मद्य विकूनच भारताला नंबर वन देश बनवतील. दिल्लीतील मद्य धोरण केजरीवाल यांच्या घरीच बनवले जात असल्याचे ते म्हणाले.

    Who is the mastermind of Delhi liquor scam? Sambit Patra said – This is what the CBI wants to know

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Goa Chief Minister Pramod Sawant slams : सकारात्मक मुद्दे नसल्याने सभेत असभ्य भाषा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचा घणाघात

    राहुल गांधी एवढे frustrate झालेत, की paid सल्लागारांचा सल्ला देखील विसरलेत, म्हणून मोदींना शिव्या देऊन राहिलेत!!

    Bihar : बिहारमध्ये NDAचे जागावाटप- जेडीयू 102, भाजप 101 जागा लढवणार