विशेष प्रतिनिधी
मुबंई : अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर भारतातील सर्वात मोठे ड्रग रॅकेट उघडकीस आले होते. प्रथम अभिनेत्री रिया चक्रवर्तीची चौकशी केली गेली. आणि त्यानंतर बऱ्याच सेलिब्रेटींना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. यामध्ये सुप्रसिध्द अभिनेत्री दीपिका पादुकोणचाहि समावेश होता. त्यानंतर बऱ्याच ड्रग पेडलर्स, मॅन्युफॅक्चर्सचा पर्दाफाश करण्याचा एनसीबीईने जणू निश्चय केला होता. या सर्व घडामोडींमागे एक प्रभावी आणि निडर व्यक्ति आहे. तो म्हणजे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे.
Who is sameer wankhede?
शनिवारी मुंबईत क्रूझ रेव्ह पार्टी मध्ये धाड घालून बऱ्याच लोकांना अटक करण्यात आली आहे. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान देखील त्या पार्टीमध्ये उपस्थित होता आणि त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे असे देखील म्हटले जात आहे.
शाहरुखचा मुलगा आर्यन खानला एनसीबीकडून अटक! “अशी” आणली होती आर्यनने ड्रग्स…!!
तर समीर वानखेडे नेमके आहेत कोण?
४० वषीय समीर वानखेडे यांचा जन्म मुंबईमध्ये झाला. त्यांचे वडीलही एक पोलिस ऑफिसर होते. तर त्यांची बायको ही एक सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे. जत्रा फेम अभिनेत्री क्रांती रेडेकर ही त्यांची पत्नी आहे. 2017 मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली होती.
२००८ मध्ये समीर वानखेडे इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस मध्ये काम करायचे. त्यानंतर त्यांनी एनसीबी जॉइन केली. याआधी त्यांनी एअर इंटेलिजन्स युनिटमध्ये देखील काम केले आहे.
बॉलीवूड सेलिब्रेटी जेव्हा एअरपोर्टवर जातात तेव्हा कोणत्याही कस्टम ड्युटीज फॉलो करत नाहीत की फाइन भरत नाहीत. असे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच सेलिब्रेटींना देखील सर्व नियम पाळणे बंधनकारक केले होते. त्यांचा हा ‘नो नॉनसेन्स अटिट्यूड’ सध्या चर्चेचा विषय आहे.
२०१३ सालि सिंगर मिल्खासिंग याला परदेशी चलनासह पकडण्यात आले होते. आजवर त्यांनी एकूण १७००० कोटी रुपयांचे ड्रग जप्त करण्यात यश मिळवले आहे.
Who is sameer wankhede?
महत्त्वाच्या बातम्या
- सशक्त, आत्मनिर्भर भारतासाठी शपथ घ्या, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आवाहन
- लालूप्रसादांच्या घरात उफाळून आली भाऊबंदकी, तेजस्वीने लालूंना दिल्लीत कोंडून ठेवल्याचा धाकटा भाऊ तेजप्रतापचा आरोप
- रामदास कदम खोटारडे, शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवींची टीका
- जलयुक्त शिवारमुळे नव्हे, तर नद्यांमधील अवैध वाळू उपशामुळे पूर; फडणवीसांचा ठाकरे – पवार सरकारला टोला