• Download App
    ज्याला पकडण्यासाठी सुरक्षा दलांनी जंग जंग पछाडलेले आहे असा कोण आहे हा क्रूर नक्षलवादी हिडमा? | Who is Hidma, who attacks on naxels

    ज्याला पकडण्यासाठी सुरक्षा दलांनी जंग जंग पछाडलेले आहे असा कोण आहे हा क्रूर नक्षलवादी हिडमा?

    विशेष प्रतिनिधी 

    रायपूर – नक्षलवादी मडवी हिडमा नेमका दिसतो कसा, त्याचे वय किती असेल याबाबत सुरक्षा दले केवळ अंदाजच व्यक्त करू शकतात. आता तो साधारणपणे ४५ वर्षांचा असला पाहिजे, असेही बोलले जाते. छत्तीसगडमधील बस्तर येथील हल्ल्यानंतर कुख्यात नक्षलवादी नेता मडवी हिडमा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. Who is Hidma, who attacks on naxels

    भारतीय कम्युनिस्ट पक्ष (माओवादी) या संघटनेच्या महत्त्वाच्या नेत्यांमध्ये हिडमाचा समावेश होतो. मागील अनेक वर्षांपासून तो तपास यंत्रणांच्या रडारवर आहे. पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मीच्या बटालियनचे नेतृत्व तो करतो.

    हिडमाने नव्वदच्या दशकामध्ये नक्षलवादी चळवळीमध्ये प्रवेश केला होता. छत्तीसगडमधील ताडमेटला येथे २०१० साली झालेल्या भीषण हल्ल्यानंतर हिडमाचे नाव चर्चेत आले होते. या हल्ल्यामध्ये ७६ जवान हुतात्मा झाले होते. हिडमाला गुरिला युद्धतंत्र अवगत असून तो नेहमी स्वतःसोबत एके-४७ रायफल बाळगतो, त्याचे सहकारी अत्याधुनिक शस्त्रे वापरतात.



    झिरम खोऱ्यामध्ये दर्भा येथे २०१३ साली झालेल्या भीषण हल्ल्यात काँग्रेसचे नेते महेंद्र कर्मा, नंदकुमार पटेल आणि व्ही.सी. शुक्ला हे मारल्या गेले होते. या हल्ल्यामागेही हिडमाचाच हात असल्याचे बोलले जाते. हिडमाची बायको राजे ही देखील नक्षलवादी संघटनेची सक्रिय सदस्य आहे, तिचाही अनेक हल्ल्यांमध्ये हात असल्याचे पोलिसांना सांगितले.

    सध्या पोलिसांकडे एका संशयिताचे काही जुने फोटो आहेत, यात दिसणारा तरुण हा हिडमा असावा असेही बोलले जाते. छत्तीसगड सरकारने त्याला पकडण्यासाठी तब्बल ४० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. मागील शनिवारी सुरक्षा दलांनी हिडमालाच पकडण्यासाठी मोहीम राबविली होती पण दुर्दैवाने सुरक्षा दलांचे नियोजन चुकले आणि ते अलगदपणे नक्षलवाद्यांच्या तावडीत सापडले. या संघर्षामध्ये केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) आणि राज्य पोलिस दलाची मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली.

    दंडकारण्य भागामध्ये या नक्षलवाद्यांचा दबदबा आहे. यामध्ये आंध्रप्रदेश, ओडिशा, तेलंगण आणि महाराष्ट्रासह छत्तीसगडमधील बस्तर भागाचाही समावेश होतो.

    Who is Hidma, who attacks on naxels

    इतर बातम्या वाचा…

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य