• Download App
    मेहूल चोक्सीच्या अटकेमागील बार्बरा जराबिका आहे तरी कोण? गर्लफ्रेंड की हनीट्रॅप? |Who is Barbara Zarabika behind Mehul Choksi's arrest? Girlfriend or Honeytrap?

    मेहूल चोक्सीच्या अटकेमागील बार्बरा जराबिका आहे तरी कोण? गर्लफ्रेंड की हनीट्रॅप?

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बॅँक घोटाळ्यातील आरोपी हिरे व्यापारी मेहूल चोक्सीच्या अटकेची कहाणी आता फिल्मी बनली आहे. बार्बरा जराबिका जिच्यामुळे मेहूल जाळ्यात अडकला ती बार्बरा जराबिका आहे तरी कोण याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.Who is Barbara Zarabika behind Mehul Choksi’s arrest? Girlfriend or Honeytrap?

    .चोक्सीला डॉमिनिका येथे पोलिसांनी अटक केली आहे.एखाद्या गडगंज उद्योजकाला प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्याचे अपहरण केल्याचे अनेक प्रकार चित्रपटांतून पाहिले असतील. चोक्सीबाबतही असेच घडले असावे अशी शक्यता आहे.

    मेहुल चोक्सी डॉमिनिकाला पोहचला तेव्हा त्याच्यासोबत जराबिका होती. परंतु ती त्याची गर्लफ्रेंड नाही तर तl अपहरण करणार्‍या टोळीची सदस्या असल्याचा आरोप मेहूल चोक्सीच्या पत्नीने आणि वकिलाने केला आहे.

    या टोळीने मेहुल चोक्सीचं अपहरण केले. त्याला मारहाण केली. त्यानंतर चोक्सीला डॉमिनिका येथे नेण्यात आले. तेथे पोलिसांनी अटक केली. बार्बरा भारतीय यंत्रणेच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप प्रीती चोकसी हिने केला आहे.

    काही दिवसांपूर्वी मेहुल चोक्सी अँटिग्वा आणि बरबुडा येथून गायब झाला होता. त्यानंतर तो डॉमिनिका येथे असल्याचे समोर आले. २३ मे रोजी मेहुलचं अपहरण करण्यात आलं होतं. अपहरण करणार्‍यांचे भारतासोबत कनेक्शन आहे

    आणि ते अँटिग्वा येथील अधिकाऱ्यांच्या मदतीनं हे अपहरण झाले. अपहरण मेहुल चोक्सीला मारहाण केली. त्याला टॉर्चर केले. त्यानंतर एका बोटीच्या सहाय्याने डॉमिनिकाला आणलं गेले. त्याठिकाणी चोक्सीला अटक झाली, असा आरोप चोक्सीच्या वकीलाने केला आहे.

    प्रीती चोकसी हिच्या म्हणण्यानुसार बार्बरा

    अँटिग्वा येथील नाही. पण चोकसी याच्याशी ओळख वाढविण्यासाठी ती तेथे राहण्यास आली. येथे राहत होती. सुरुवातीला मेहुल चोक्सीसोबत ओळख वाढविली. सकाळी, संध्याकाळी मेहुल बाहेर फिरण्यासाठी जात होता तिथेच सापळा रचला होता.

    त्यानंतर या दोघांमध्ये मैत्री झाली. २३ मे रोजी या महिलेने मेहुल चोक्सीला ती राहत असलेल्या अपार्टमेंटमध्ये भेटण्यासाठी बोलावले. मेहुल ज्यावेळी तिच्या घरी पोहचला तेव्हा अपहरण करणारे अन्य साथीदार तिथेच होते. या सगळ्यांनी मेहुलचं अपहरण करून त्याला डॉमिनिकाला आणले.

    रविवारी अँटिग्वा आणि बरबुडा पंतप्रधान ग्रॅस्टोन ब्राऊनने सांगितले की, मेहुल चोक्सी त्याच्या गर्लफ्रेंडसोबत डॉमिनिकाला गेला होता. तिथे त्याला पकडण्यात आलं.

    ग्रॅस्टन यांनी डॉमिनिका सरकारला आवाहन करून मेहुल चोक्सीला थेट भारतात पाठवलं जावं असं म्हटलं.बार्बरा हिने स्वतःची ओळख गुंतवणुक सल्लागार अशी करून दिली होती. तिच्या सोशल मीडिया अकाऊंट वर तिने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक येथे शिक्षण घेतले आहे.

    मात्र लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिकने अशी कोणतीही महिला आमच्या येथे शिकली नसल्याचे म्हटले आहे. त्यातच बार्बर आता गायब झाली आहे त्यामुळे संशय वाढत आहे असे प्रीती चोकसी हिने म्हटले आहे.

    Who is Barbara Zarabika behind Mehul Choksi’s arrest? Girlfriend or Honeytrap?

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi, : पीएम मोदी म्हणाले- लालू यादव यांनी विकासाऐवजी जंगलराज निवडले, बिहारच्या निकालांनी धडा शिकवला

    SC Notice : मनमानी विमान भाडेवाढीबाबत सर्वोच्च न्यायालयाने मागितले उत्तर; केंद्र, DGCA आणि AERA यांना नोटीस

    Delhi Blast, : दिल्ली स्फोटप्रकरणी अतिरेकी उमरच्या आणखी एका साथीदाराला अटक; ड्रोन-रॉकेट बनवले, तांत्रिक मदत पुरवली