विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : जेव्हा बिल क्लिंटन आणि टोनी ब्लेअर वगैरेंनी जगात लेफ्ट लिबरल सिस्टीम सुरू केली, तेव्हा त्यांना मोठे लोकशाहीवादी “स्टेट्समन” म्हणून गौरविण्यात आले, पण आता जेव्हा ट्रम्प लोकशाही मार्गाने निवडून येतात, मेलोनी + मोदी जागतिक पातळीवर एकमेकांशी संवाद साधतात, तेव्हा त्यांना हुकूमशाहीवादी म्हणून हिणवण्यात येते, हेच लेफ्ट लिबरल सिस्टीमचे डबल स्टॅंडर्ड आहे, अशी घणाघाती टीका इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी केली होती. नेमके त्याचेच प्रत्यंतर अमेरिकेत आले.
अमेरिकेत ज्यावेळी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस मधली माध्यमांची मक्तेदारी मोडून काढली, त्यावेळी प्रस्थापित माध्यमांनी ट्रम्प तात्यांनी अविष्कार स्वातंत्र्याचा गळा घोटला हो!!, असा आरडाओरडा सुरू केला.
त्याचे झाले असे :
अमेरिकन अध्यक्षांच्या बातम्या कव्हर करण्यासाठी अमेरिकेत पत्रकार आणि वृत्तसंस्थांची गर्दी वाढू लागल्यानंतर व्हाईट हाऊसने तिथल्या प्रेस पूल मध्ये रोटेशन आणायचा निर्णय घेतला. त्या रोटेशन नुसार सगळ्या वृत्तसंस्था आणि पत्रकारांना व्हाईट हाऊस मध्ये प्रवेश मिळेल, असे जाहीर केले. इतकेच काय पण त्यांनी प्रेस पूल मध्ये प्रस्थापित माध्यमांच्या बरोबरीने सोशल मीडियातल्या कंटेंट क्रिएटर्सना देखील स्थान दिले. त्यामुळे रॉयटर्स, ब्लूमबर्ग, असोसिएटेड प्रेस या बड्या वृत्तसंस्थांची मक्तेदारी मोडीत निघाली. या वृत्तसंस्थांच्या पत्रकारांना व्हाईट हाऊस मध्ये कव्हरेजसाठी स्थान मिळणार नाही, असे अजिबात घडले नाही, पण फक्त त्यांना प्रेस पूलच्या रोटेशन मध्ये आणले म्हणून या बड्या वृत्तसंस्थांनी ट्रम्प प्रशासनाने अविष्कार स्वातंत्र्याचा गळा घोटल्याचा आरडाओरडा सुरू केला.
मूळात प्रेस पूल ही संकल्पना व्हाईट हाऊस मध्ये अमेरिकन अध्यक्षांच्या बातम्या कव्हरेजसाठी माध्यमांची गर्दी वाढू लागली, त्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी राबविण्यात आली. त्याची सुरुवात 1950 च्या दशकात अध्यक्ष डेव्हिड डिव्हाइट आयसेनहॉवर यांच्या झाली. सुरुवातीला त्यामध्ये कुणाचीच मक्तेदारी नव्हती, पण नंतर टप्प्याटप्प्याने रॉयटर्स, ब्लूमबर्ग, असोसिएटेड प्रेस वगैरे वृत्तसंस्थांची मक्तेदारी तयार झाली. व्हाईट हाऊस करस्पॉन्डन्स असोसिएशन नावाची पत्रकार संघटना प्रेस पूल मध्ये कुठल्या माध्यम प्रतिनिधींना आणि वृत्तसंस्थांना स्थान द्यायचे हे ठरवू लागली. ही पत्रकारांची स्वतंत्र संघटना असल्याचे सांगितले जाऊ लागले. पण फक्त बड्या वृत्तसंस्था आणि निवडक बड्या वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींनाच व्हाईट हाऊस प्रेस पूल मध्ये कायमचे स्थान निर्माण झाले.
इतरांना प्रेस पूल मध्ये कधी स्थानही मिळाले नाही. त्यातून अमेरिकन माध्यमांच्या मधल्या मध्यम आकाराच्या वृत्तसंस्था, छोट्या आकाराच्या वृत्तसंस्था आणि पत्रकार यांची वर्षानुवर्षे कोंडी झाली. पण तेव्हा बड्या वृत्तसंस्थांपैकी कोणीही अविष्कार स्वातंत्र्याचा गळा घोटल्याचा आरडाओरडा केला नव्हता. पण त्यांना ट्रम्प प्रशासनाने व्हाईट हाऊसच्या प्रेस पूल मधल्या रोटेशन मध्ये आणून त्यांची मक्तेदारी मोडून काढली. त्याबरोबर त्यांनी लगेच आविष्कार स्वातंत्र्याचा गळा घोटला गेल्याचा आरडाओरडा सुरू केला.
यातूनच वर उल्लेख केल्याप्रमाणे जॉर्जिया मेलोनी यांनी केलेल्या भाषणातील तथ्याचा प्रत्यय आला.
White House eliminates permanent spot for news services in press pool
महत्वाच्या बातम्या
- Sukanta Majumdar तृणमूल नेत्यांकडे वक्फची जमीन, म्हणूनच ते हिंसाचार भडकावताय – सुकांता मजुमदार
- Aamby Valley City : ‘ED’ची मोठी कारवाई ; अॅम्बी व्हॅली सिटीजवळील ७०७ एकर जमीन जप्त
- तृणमूल नेत्यांकडे वक्फची जमीन, म्हणूनच ते हिंसाचार भडकावताय – सुकांता मजुमदार
- Siddaramaiah : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का!
Rahul Gandhi : राहुल गांधींचे लखनऊ न्यायालयात सरेंडर, 5 मिनिटांनी जामीन; सैन्यावरील टिप्पणीचा खटला