• Download App
    मुख्यमंत्री योगींचे कौतुक करताना नितीन गडकीरींनी भगवान श्रीकृष्णाचं दिलं उदाहरण, म्हणाले...While praising Chief Minister Yogi Nitin Gadkiri gave the example of Lord Krishna

    मुख्यमंत्री योगींचे कौतुक करताना नितीन गडकीरींनी भगवान श्रीकृष्णाचं दिलं उदाहरण, म्हणाले…

    ‘’… तर देशात रामराज्य निर्माण होईल हा माझा विश्वास आहे.’’ असंही गडकरींनी म्हटलं आहे.

    प्रतिनिधी

    उत्तर प्रदेशमध्ये १०हजार कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं भूमिपुजन आणि लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सोमवारी पार पडले. यावेळी बोलताना नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कामाचे कौतुक केले.  योगींच्या कामाचे कौतुक करताना गडकरींनी भगवान श्रीकृष्णाचे उदाहरण दिले, शिवाय भगवद्गीतेमधील ओवीचाही संदर्भ दिला. While praising Chief Minister Yogi Nitin Gadkiri gave the example of Lord Krishna

    नितीन गडकरी म्हणाले,’’मला अतिशय आनंद होतोय की, बुंदेलखंडच्या ऐतिहासिक भूमीवर महोबामध्ये येण्याची संधी मला लाभली. बुंदेलखंड आणि महाराष्ट्राचं फार जुनं नातं राहीलं आहे. आमच्या सर्वांच्या जीवनात लहानपणापासून छत्रपती शिवाजी महाराज, आमच्या जीवनाचे आदर्श आहेत. स्वाभाविकपणे त्यांचं वर्ण केलं गेलं होतं. यशवंत, कीर्तीवंत, वरदवंत, सामार्थ्यंत जाणता राजा. निश्चयाचा महामेरू, बहुतजनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी असे छत्रपती शिवाजी महाराज आणि बुंदेलखंडचे छत्रसाल महाराज यादोघांमध्ये फार घनिष्ट मैत्री होती. सतराव्या शतकात ही मैत्री फार मजबूत झाली होती, ती देशाच्या इतिहासात फार महत्त्वपूर्ण आहे. ही वीरांची भूमी आहे आणि याच भूमीवर एक इतिहास निर्माण करत आहेत, आपले योगीजी.’’


    अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आवारातील मशीद हटवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश!


    याचबरोबर ‘’मी आज देशातील जनतेच्यावतीने त्यांना धन्यवाद देईन. भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेत एक सांगितलं आहे, जे योगींचे काम पाहून आठवते. “परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे’’ राजा असा असला पाहिजे. जो माता-भगिनींची रक्षा कऱणारा पाहिजे, सज्जनांची रक्षा करणारा पाहिजे. राजा असा पाहिजे जो अन्याय करणाऱ्यांना उखडून टाकणारा पाहिजे. दुर्जन आणि दुष्टांचा संहार करणार पाहिजे, हाच भगवान श्रीकृष्णांचा गीतेमध्ये संदेश आहे.’’ असंही गडकरींनी यावेळी सांगितलं.

    याशिवाय ‘’योगीजी मी तुम्हाला देशाच्या जनतेच्यावतीने धन्यवाद देतो, की सज्जनशक्तीच्या रक्षणासाठी धर्माच्या कर्तव्यानुसार आचरण करत, जे दुराचारी, दुष्ट आणि दुर्जन होते. जे गरिबांचे शोषण करत होते, जे अन्याय आणि अत्याचार करत होते. चुकीच्या मार्गाने अवैध संपत्ती कमावत होते, त्यांच्यावर तुम्ही बुलडोजर फिरवून देशात आदर्श निर्माण केला. उत्तर प्रदेशची जनता तर तुमच्यवर खुश आहेच, मी देशाच्या जनतेच्यावतीने तुम्हाला खूप धन्यावद देतो आणि तुमचे अभिनंदन करतो. तुम्ही याच कार्याने पुढे जाल तर खरंच अयोध्येत तर आता राम मंदिर निर्माण झाले आहे, पण देशात रामराज्य निर्माण होईल हा माझा विश्वास आहे.’’ असंही नितीन गडकरींनी यावेळी बोलून दाखवलं.

    While praising Chief Minister Yogi Nitin Gadkiri gave the example of Lord Krishna

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!