• Download App
    मोदींचे above the party line; त्यांच्या मुकाबल्यात नितीश कुमारांचे Limiting in the opposition party lines!!While PM Narendra Modi is establishing his leadership above the party line, Nitish Kumar is limiting his leadership in opposition party lines

    मोदींचे above the party line; त्यांच्या मुकाबल्यात नितीश कुमारांचे Limiting in the opposition party lines!!

    विनायक ढेरे

    बिहारमध्ये नितेश कुमार यांच्या सुरू असलेल्या राजकीय हालचाली पाहता ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी त्यांचे वर्णन “उद्धव ठाकरे” असे केले आहे. म्हणजे त्यांचे राजकीय भवितव्य उद्धव ठाकरे यांच्यासारखे होईल, असे त्यांचे मत आहे. पण नितीश कुमार यांच्या बाबतीत त्यांचे राजकीय दृष्ट्या उद्धव ठाकरे होणे एवढ्या पुरते मर्यादित आहे का?? तर वस्तुस्थिती त्या पलिकडची आहे!! While PM Narendra Modi is establishing his leadership above the party line, Nitish Kumar is limiting his leadership in opposition party lines

    नीती आयोगाची बैठक

    या साठी कालच्या नीती आयोगाच्या गव्हर्नमेंट कौन्सिलच्या बैठकीच्या बातम्यांवर नीट नजर टाकली पाहिजे. या सर्व बातम्यांचा आणि विशेषतः त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विविध फोटोंचा बारकाईने अभ्यास केला पाहिजे. तो केला तर एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे पंतप्रधान मोदी हे लोकसभेची निवडणूक अजून 2 वर्षे दूर असताना above the party line निघाले आहेत… आणि जर मोदी above the party line निघाले असतील, तर नितीश कुमार मात्र बिहारमध्ये भाजपशी संबंध तोडून काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता असे दलाशी जुळवून घेत स्वतःला limiting in the opposition party lines करत आहेत, म्हणजेच ते स्वतःला विरोधी पक्षांच्या मर्यादेत राजकीय दृष्ट्या कोंबू पाहत आहेत, असेच दिसून येते. केंद्रीय पातळीवर विरोधी पक्षांची “स्पेस” आधीच मर्यादित आहे. त्यात नितेश कुमार यांच्या पक्षाची संयुक्त जनता जनता दलाची भर पडेल इतकीच नितेश कुमार यांची बिहार मधली राजा की हालचाल मर्यादित आहे!!

    मोदींचा सर्वपक्षीय मुख्यमंत्र्यांशी संवाद

    मोदींनी नीती आयोगाच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. एरवी मोदींशी फटकून वागणाऱ्या आणि त्यांची प्रत्येक बैठक टाळणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री
    ममता बॅनर्जी या त्या बैठकीला उपस्थित होत्या. इतकेच नाही तर त्यांनी आधी पंतप्रधान मोदींची त्यांच्या अधिकृत निवासस्थाने जाऊन भेटही घेतली होती. या भेटीतून बंगाल भाजपमध्ये अस्वस्थता जरूर पसरली. पण मोदींचे मात्र यातून प्रतिमावर्धन झाले. मोदींनी फक्त ममता बॅनर्जी यांच्याशीच असा संवाद साधला असे नाही, तर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी देखील ते बोलले. नीती आयोगाच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांशी संवादाचे त्यांचे जे फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले आहेत, त्यातून मोदींचा विविध पक्षांच्या मुख्यमंत्र्यांशी मोदींचा सहज संवाद दिसून येतो किंबहुना आपला या सर्व मुख्यमंत्र्यांची सहज संवाद सुरू आहे हे दाखवण्यासाठीच ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले होते.

    एकनाथ शिंदे एपिसोड

    परंतु महाराष्ट्रातल्या मराठी माध्यमांनी मात्र फक्त एकनाथ शिंदे हे कसे मागच्या रांगेत उभे होते, यातून महाराष्ट्राचा कसा अपमान झाला एवढे मर्यादितच त्याचे विश्लेषण केले होते.
    पण नीती आयोगाच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवरचे फोटो राजकीय त्या दृष्ट्या त्यापेक्षा कितीतरी अधिक अर्थ सांगून जाणारे होते. त्याकडे मराठी माध्यमांनी दुर्लक्ष केले. आणि तो राजकीय अर्थच मुळी मोदी हे अबाउत पार्टीला लाईन निघाल्याचा आहे.

    मोदींचा नव्हे, विरोधकांचा स्पर्धक वाढला

    मग या पार्श्वभूमीवर नितीश कुमार यांची बिहार मधली राजकीय हालचाल काय सांगते?, तर त्यांच्या रूपाने मोदींसमोर 2024 च्या निवडणुकीसाठी एक नवा स्पर्धक उभा राहतो आहे. पण ही स्पर्धा मोदींशी होण्याऐवजी केंद्रीय नेतृत्वाच्या स्पर्धेतला एक नेता वाढला, एवढ्याच पुरते नितीश कुमार यांचे नेतृत्व मर्यादित राहणार आहे. पंतप्रधान होण्याची महत्त्वाकांक्षा तर अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. सी. आर. चंद्रशेखर राव यांना देखील आहे. ते देखील आपला मोदी विरोध अजिबात लपवत नाहीत. उलट मोदी विरोधात आक्रमकपणे बोलतात. मग अशावेळी नितीश कुमार हे बिहार मधले भाजपच्या पाठिंबावरचे स्वतःचे सरकार पाडून काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाशी पुन्हा आघाडी करत नवीन सरकार आणून राजकीय दृष्ट्या नेमके काय मिळवणार आहेत?? बिहार मधले कदाचित सरकार बदलेल. त्यातून भाजप विरोधी परस्पेशन काही काळापुरते तयार होईल. पण त्या पलिकडे जाऊन नितीश कुमार यांचा राजकीय लाभ कितपत होईल??, याविषयी खरंच शंका आहे.

    विरोधी पक्षनेत्यांची प्रतिमा मोदींपेक्षा मोठी कुठेय??

    कारण एकीकडे जर मोदी above the party line निघाले असतील तर मोदीविरोधातल्या कोणत्याही नेत्याला स्वतःची प्रतिमा मोदींपेक्षा उंचावलेलीच निर्माण केली पाहिजे. किंबहुना त्यासाठी मोदींपेक्षा जास्त प्रयत्न केले पाहिजेत. मग नितीश कुमार, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल किंवा केसीआर चंद्रशेखर राव हे तसे प्रयत्न करताना दिसतात का?? हा खरा प्रश्न आहे आणि ते जर तसे प्रयत्न करताना दिसत नसतील किंवा त्यांच्या प्रयत्नांना त्यांच्या त्यांच्या राज्यातली प्रादेशिक मर्यादा असेल तर मग ते मोदींसमोर कसे काय आव्हान उभे करू शकतात?? हा आधीच्या प्रश्नापेक्षाही मोठा प्रश्न आहे. या अर्थाने मोदी जेव्हा above the party line निघाले आहेत, तेव्हा नितीश कुमार हे भाजप विरोधातील हालचाली करून आणि बिहारचे सरकार गडगडवून स्वतःलाच limiting in the opposition party lines करत आहेत, हेच सिद्ध होते आहे. आज 8 ऑगस्ट 2024 रोजीचे हे राजकीय वास्तव आहे.

    While PM Narendra Modi is establishing his leadership above the party line, Nitish Kumar is limiting his leadership in opposition party lines

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य