विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सगळ्या जगाने उजळलेल्या प्रकाशात पाहिला, तेव्हा एका व्यक्तीची “अंधार यात्रा” सुरू होती. त्या व्यक्तीने दिवाभीतासारखा मोदींचा शपथविधी सोहळा अंधारात बसून पाहिला ही व्यक्ती दुसरी – तिसरी कोणी नसून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी होत्या!! While Modi’s swearing-in ceremony was seen in bright light, Mamata was sitting in the dark like daylight
ममता बॅनर्जींनी मोदींच्या शपथविधी समारंभाच्या वेळी घरातले सगळे लाईट्स बंद केले होते आणि त्या शांतपणे बसून राहिल्या होत्या, अशा आशयाचा खुलासा त्यांच्याच तृणमूळ काँग्रेसच्या राज्यसभा खासदार सागरिका घोष यांनी केला. त्यांनी तशी पोस्ट आपल्या सोशल मीडिया हँडलवर लिहिली.
या पोस्टमध्ये त्यांनी मोदींच्या शपथविधी सोहळ्याला दोन-चार टोमणे मारले. वास्तविक मोदींनी जनमत गमावले. भाजप वाराणसी, अयोध्ये मध्ये हरला. मोदींनी स्वतःच खूप मोठे कॅम्पेन चालवले, पण त्यांना साधे बहुमत देखील मिळवता आले नाही. त्यामुळे खरं म्हणजे भाजपने मोदींना “रिप्लेस” करायला हवे होते, पण त्या ऐवजी मोदींनीच स्वतःच्या शपथविधीचे “सेलिब्रेशन” केले. मात्र त्यावेळी ममता बॅनर्जी घरातले लाईट बंद करून अंधारात बसल्या होत्या. यातून त्यांनी सगळ्या भारताला विशिष्ट संदेश दिला, असा दावा सागरिका घोष यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्ट मधून केला.
यात त्याच सागरिका घोष आहेत की, ज्या वेगवेगळ्या न्यूज चॅनलच्या अँकर होत्या. त्या राजदीप सरदेसाईच्या पत्नी आहे. आणि खान मार्केट लिबरल गँगच्या सदस्या आहेत.
While Modi’s swearing-in ceremony was seen in bright light, Mamata was sitting in the dark like daylight
महत्वाच्या बातम्या
- केंद्राने कर हस्तांतरणापोटी राज्यांना जारी केला 1,39,750 कोटी रुपयांचा हप्ता
- Modi Cabinet 2024 List: नड्डा आरोग्य मंत्री, निर्मला अर्थमंत्री, धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री झाले… पाहा मंत्र्यांची संपूर्ण यादी
- Modi 3.0 : मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्यापेक्षा खातेवाटपात मोठी जबाबदारी आणि शिकण्याची संधी!!
- टी20 विश्वचषकात भारताविरोधात पाकिस्तानच्या पराभवावर दिल्ली पोलिसांची मजेदार पोस्ट