विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यभरातील 48 हजार फेसबुक वापरकर्त्यांची खाती हॅक करून त्याचा गैरवापर झाल्याचे उघड झाले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची खातीही हॅक झालीआहे. अँड्रॉईड अॅप्स डाऊनलोड केल्याने गोपनीय डेटा चोरीला जातो. त्यातूनच खाते हॅक होत असल्याची माहिती सायबर सेलने दिली आहे.While downloading apps, be careful, hack 48,000 Facebook accounts and misuse, even cheat senior police officers
अँड्रॉईड मोबाईलवर डाऊनलोड करण्यात आलेल्या काही अॅप्सच्या माध्यमातून फेसबुक वापरकर्त्यांचे पासवर्ड चोरले गेल्याचे सायबर पोलिसांच्या तपासात समोर आले आहे मागील सात महिन्यांत राज्यभरातून 48 हजार फेसबुक वापरकर्त्यांची खाती हॅक झाली आहेत.
एटीएसचे प्रमुख शिवदीप लांडे यांचे खाते हॅक करण्यात आले होते. तिथून हॅकर्सचा शोध सुरू झाला. फेसबुक हॅकर्सच्या कचाट्यातून बड्या नेत्यांसह पोलिस दलातील उच्च पदावरील अधिकारी देखील सुटलेले नाहीत. हॅकर्सनी प्रत्येक जिल्ह्यातील खाती हॅक केली आहेत.
वापरकर्त्याच्या गुगल किंवा फेसबुक खात्यावर विविध अॅप्सच्या बनावट जाहिराती दिसतात. वापरकर्ते जाहिरातींवर क्लिक करतात. जाहिरातीचे अॅप खात्यातील कुकीज आणि पासवर्डची चोरी करतात. त्यामुळे कोणतेही अॅप डाऊनलोड करताना त्याची खात्री करा आणि सतत पासवर्ड बदलत राहा, असे आवाहन सायबर सेलच्या अधिकाºयांनी केले.
While downloading apps, be careful, hack 48,000 Facebook accounts and misuse, even cheat senior police officers
महत्त्वाच्या बातम्या
- असेही महिला सक्षमीकरण, महिला सरपंचाकडे ११ कोटींची माया, एक एकराचा स्विमींग पूल असलेला बंगला
- पैसे केंद्रांचे आणि विज्ञान अविष्कार नगरीला राजीव गांधींचे नाव, रतन टाटा यांचे नाव देण्याची पिंपरी-चिंचवडकरांची मागणी
- राफेलचे लॅँडींग झाले पण राहूल गांधींचे टेक ऑफ होऊ शकले नाही, राफेलचा आनवश्यक मुद्दा उचलल्याचा परिणाम, राजनाथ सिंह यांची टीका
- भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी रोना विल्सनची जामिनासाठी एनआयएच्या विशेष न्यायालायत याचिका