• Download App
    Tej Pratap Yadav होळी साजरा करताना तेजप्रताप यादव यांनी

    Tej Pratap Yadav : होळी साजरा करताना तेजप्रताप यादव यांनी पोलिस कर्मचाऱ्यासा धमकावले अन् म्हटले…

    Tej Pratap Yadav

    सत्ता गमावून अनेक वर्ष झाली तरीही राजदच्या राजकुमारांचा अहंकार अजूनही गेलेला नाही, भाजपची जोरदार टीका


    विशेष प्रतिनिधी

    पाटणा : Tej Pratap Yadav बिहारमध्ये दारूबंदी आहे आणि तरीही लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव होळीच्या सणात दारू प्यायला असल्याचे वृत्त आहे. १४ मार्च रोजी संपूर्ण देशाने होळीचा सण साजरा केला आणि सर्वत्र आनंदाचे रंग दिसून आले. तेज प्रताप यादवही त्याच उत्साहात दिसले, परंतु त्यांच्या कथित मद्यधुंद अवस्थेमुळे ते वादात सापडले आहेत. एवढेच नाही तर ते होळीच्या दिवशी एका जवानास नाचण्यास सांगत होता.Tej Pratap Yadav



    होळीनिमित्त पाटणा येथे एका कार्यक्रमात तेज प्रताप यादव उपस्थित होते. तेजप्रताप यादव होळी साजरी करतानाचे काही फोटो समोर आले आहेत, त्यापैकी एका फोटोमध्ये ते गुलाल फेकताना दिसत आहे. इथे नंतर तेजप्रताप यांनी कुर्ता फाडून होळी खेळायला सुरुवात केली. तथापि, ज्या व्हिडिओवरून वाद सुरू आहे त्यात तेज प्रताप यादव एका पोलिसाला नाचण्यास सांगत होते आणि जर त्याने तसे केले नाही तर त्याला निलंबित करण्याची धमकी देत ​​होते.

    भाजप नेते अमित मालवीय यांनी व्हिडिओ शेअर केला आणि आरोप केला की लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेजप्रताप यादव याने दारूच्या नशेत एका कॉन्स्टेबलला धमकावले आणि होळीच्या कार्यक्रमादरम्यान त्याला नाचण्यास भाग पाडले. अमित मालवीय पुढे लिहितात की त्यांना सत्ता गमावून दशके झाली आहेत, पण राजदच्या राजकुमारांचा अहंकार अजूनही गेलेला नाही.

    While celebrating Holi, Tej Pratap Yadav threatened a police officer

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Beating Retreat 2026 : विजय चौकात बीटिंग रिट्रीट समारंभ; तिन्ही सशस्त्र दलांनी राष्ट्रपती मुर्मू यांना राष्ट्रीय मानवंदना दिली; उपराष्ट्रपती आणि PM देखील उपस्थित

    Ranveer Singh : रणवीर सिंहविरोधात FIR दाखल; चावुंडी दैव परंपरा आणि हिंदू भावनांचा अपमान केल्याचा आरोप

    Economic Survey 2026 : देशाचे ‘आर्थिक रिपोर्ट कार्ड’ संसदेत सादर; FY27 मध्ये GDP वाढ 6.8% ते 7.2% राहण्याचा अंदाज, महागाई-नोकऱ्यांवरही अपडेट