• Download App
    दक्षिणेत काँग्रेसची भारत जोडो यात्रा जोरावर असताना गोव्यात 8 आमदार फूटले! While bharat Jodo yatra in full swing in south, 8 Congress MLAs splits in Goa

    दक्षिणेत काँग्रेसची भारत जोडो यात्रा जोरावर असताना गोव्यात 8 आमदार फूटले!

    वृत्तसंस्था

    पणजी : दक्षिणेत तामिळनाडू आणि केरळमध्ये काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा जोमात असताना गोव्यात पक्षाच्या निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचा पक्षावर विश्वास नसल्याचे स्पष्ट झाले आहे. गोव्यात काँग्रेसचे विधानसभेत नुकतेच निवडून आलेले 8 आमदार फुटले आहेत. While bharat Jodo yatra in full swing in south, 8 Congress MLAs splits in Goa

    फुटलेल्या 8 आमदारांमध्ये माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचा देखील समावेश असून त्यांच्याच बरोबर मायकेल लोबो, दिलेह लोबो, राजेश फळदेसाई, केदार नाईक, संकल्प अमोणकर, ॲलेक्स सिक्वेरा आणि रुडॉल्फ फर्नांडिस यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेतल्यानंतर या सर्व आमदारांनी विधानसभा अध्यक्षांची भेट घेऊन त्यांना काँग्रेस मधून बाहेर पडत असल्याचे पत्र दिले आहे.


    गोव्यात सांस्कृतिक पुनरुत्थान : पोर्तुगीजांनी उद्ध्वस्त केलेली मंदिरे पुन्हा बांधणार; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांची घोषणा


    खासदार राहुल गांधी दक्षिणेत भारत जोडो यात्रेत सध्या मग्न आहेत. यात्रेदरम्यान विविध चर्चेस आणि मशिदींना त्यांनी भेटी दिल्या आहेत. त्याचबरोबर आजच त्यांनी नारायण गुरु मंदिराला देखील भेट दिली आहे. या संकल्प यात्रेतून काँग्रेससाठी अल्पसंख्यांक मतांची बेगमी करण्याची त्यांची मनोकामना आहे. एकीकडे ते भारत जोडो यात्रेत मग्न असताना पक्षाचे लोकप्रतिनिधी मात्र नेतृत्वावर अविश्वास दाखवून बाहेर पडत आहेत. गोव्यातली ही फूट त्याचीच निदर्शक असल्याचे दिसते आहे.

    काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मात्र गोव्यातल्या फुटीसाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला जबाबदार धरले आहे. भाजपने पैशाची लालूच दाखवून काँग्रेस आमदार फोडले असल्याचा आरोप काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे.

    While bharat Jodo yatra in full swing in south, 8 Congress MLAs splits in Goa

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही