विशेष प्रतिनिधी
बुलंदशहर : उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर सर्व ४०३ जागा लढणार असल्याची घोषणा करताना काँग्रेसच्या सरचिटणीस आणि उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियांका गांधी यांनी समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पक्षावर हल्लाबोल केला आहे.While announcing that Congress will all the seats in Uttar Pradesh on its own, Priyanka Gandhi attacked SP and BSP
बुलंदशहर येथे काँग्रेस प्रतिज्ञा संमेलनात त्यांनी ही घोषणा केली. संमेलनास ७ हजार ४०० कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. त्यात निवडणुकीची रणनीती, प्रचार मोहीम, सोशल मीडिया इत्यादी मुद्यांवर चर्चा झाली. त्या म्हणाल्या की, जनतेची लढाई समाजवादी पार्टी किंवा बहुजन समाज पक्ष लढत नाही तर केवळ कॉँग्रेस लढत आहे.
हाथरस, उन्नावमध्ये हे दोन्ही पक्ष कोठेही दिसले नाहीत. कॉँग्रेस रस्त्यावर उतरून जनतेची लढाई लढत आहेत. आमचे पदाधिकारी, नेते आंदोलन केल्यामुळे तुरुंगात गेले आहेत. मात्र, या दोन्ही पक्षांचे नेते कोठेही दिसले नाही.
कोणत्याही परिस्थितीत आघाडी करू नका, असे सर्व कार्यकर्त्यांनी मला सांगितले होते. मी तुम्हाला आश्वासन देते की आपण सर्व जागांवर स्वबळावर लढू. पक्षाने जनतेच्या मुद्यांवर संघटनेच्या जोरावर संघर्ष केला आहे. इतर पक्ष जनतेसाठी लढले नाहीत, असेही गांधी यांनी सांगितले.
स्वातंत्र्यासाठी गांधीजी, पंडीत नेहरू, सरदार पटेल आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी बलिदान दिले. मात्र, भाजपाच्या नेतृत्वाला स्वातंत्र्याचा अर्थच माहित नाही. हाथरसमध्ये पीडितेच्या कुटुंबाला हे देखील स्वातंत्र्य मिळाले नाही की ते आपल्या मुलीचे अंतिम संस्कार करू शकतील. त्यामुळे करा किंवा मरा अशी परिस्थिती पुन्हा एकदा आली आहे.
While announcing that Congress will contest all the seats in Uttar Pradesh on its own, Priyanka Gandhi attacked SP and BSP
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रातील हिंसाचाराचे पाकिस्तानी कनेक्शन? आतापर्यंत 100 हून अधिक एफआयआर, 25 जणांना अटक, वाचा सविस्तर…
- रझा अकादमी म्हणजे काय? : धार्मिक प्रकाशन करणारी संस्था ते दंगलींपर्यंतचा प्रवास, आझाद मैदानाची दंगल ते सध्याचा हिंसाचार, वाचा सविस्तर…
- बालविवाह रोखण्यासाठी ठोस उपाय योजना करणे गरजेचे ; राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
- “ज्यांनी जे काम केले आहे त्यांना त्याचे श्रेय त्यांनाच दिले पाहिजे” – अजित पवार
- कोल्हापूर विमानतळावरील अनियमित विमानसेवेमुळे प्रवाशांमध्ये नाराजी