• Download App
    अफगाणिस्तानाचे परागंदा अध्यक्ष अश्रफ घनी यांना कोणता देश आश्रय देणार? साऱ्या जगाचे लागले लक्ष |Which country will give stay to Ghani

    अफगाणिस्तानाचे परागंदा अध्यक्ष अश्रफ घनी यांना कोणता देश आश्रय देणार? साऱ्या जगाचे लागले लक्ष

    विशेष प्रतिनिधी

    काबूल – अफगाणिस्तानातून परागंदा झालेले अध्यक्ष अश्रफ घनी यांना आता कोणता देश आश्रय देणार याकडे साऱ्या जगाचे लक्ष लागलेले आहे. अमेरिकेच्या पाठिंब्याने ते अध्यक्ष झाले होते. त्यामुळे ते अमेरिकेत जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.Which country will give stay to Ghani

    घनी यांनी देश सोडताच काल त्यांना ताजिकिस्तानने पहिला झटका दिला होता. अफगाणिस्तानातून ताजिकिस्तान येथे आलेल्या घनी यांच्या विमानाला उतरण्यास परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे त्यांना नाईलाजाने ओमानला थांबावे लागले होते. आता ते ओमानहून अमेरिकेला रवाना होवू शकतात.



    अश्रफ घनी यांच्याशिवाय अफगाणिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोहिब देखील ओमानमध्ये आहेत. दोघांच्या विमानाला ताजिकस्तानमध्ये उतरता आले नाही आणि त्यांना ओमानकडे वळावे लागले. ७२ वर्षीय अश्रफ घनी हे अफगाणिस्तानचे चौदावे अध्यक्ष आहेत. त्या आधी ते देशाचे अर्थमंत्री आणि काबूल विद्यापीठाचे कुलगुरू देखील राहिले आहेत.

    Which country will give stay to Ghani

    विशेष प्रतिनिधी

    Related posts

    Bihar Voter List : बिहारच्या व्होटर लिस्टमध्ये नेपाळ-बांगलादेशचे लोक; 1 ऑगस्टपासून चौकशी

    Indian Railways : रेल्वेच्या 74 हजार डब्यांमध्ये CCTV कॅमेरे; 15 हजार इंजिनमध्येही बसवणार

    Shubhanshu Shukla : निरोप समारंभात शुभांशू अंतराळातून म्हणाले- भारत आज भी सारे जहाँ से अच्छा! आज पृथ्वीवर परतणार