विशेष प्रतिनिधी
दिल्ली : डॉ. मनमोहन सिंग यांनी 10 वर्षे भारताचे पंतप्रधान म्हणून कांम पाहिले होते. या 10 वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी एकूण 101 देशांना भेटी दिल्या होत्या. प्रत्येक भेटी नंतर त्यांना अनेक भेटवस्तू मिळाल्या होत्या. पण ह्या कोणकोणत्या वस्तू होत्या हे तुम्हाला माहीत आहे का? चला तर पाहूया.
Which 101 gifts did former Prime Minister Manmohan Singh receive?
मे 2014 पर्यंत मनमोहन सिंग यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून काम पाहिले होते. ह्याच वर्षी त्यांच्या या भेटवस्तुं बद्दल एक आरटीआय दाखल करण्यात आला होता. ज्यामध्ये डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान पद सोडल्या नंतर देश-विदेशातून मिळालेल्या कोणकोणत्या भेट वस्तू ते घेऊन गेले याची माहिती देण्यात यावी, असे म्हटले होते. यासोबतच त्यांनी त्यांच्या कार्यकाळात एकूण कमावलेल्या रकमेची (पगार आणि भत्त्यांसह) माहितीही मागवण्यात आली होती.
पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) ‘माहितीचा अधिकार’ अंतर्गत दाखल केलेल्या या आरटीआयला उत्तर देताना पुढील माहिती दिली होती. या अंतर्गत पंतप्रधानांना परदेशातून मिळालेल्या भेटवस्तूंबद्दल माहिती देण्यात आली होती पण कोणती भेटवस्तू कोणी दिली ही माहिती सांगने नियमा विरुद्ध होते म्हणून ही माहिती देण्यात आली न्हवती.
30 जून 2013 पर्यंत त्यांना परदेशातून मिळालेल्या काही भेटवस्तूंची यादी खालील प्रमाणे,
फेब्रुवारी 2008 चांदीची बनवलेली बोटीची प्रतिकृती किंमत 8000 रुपये. ऑगस्ट आणि सप्टेंबर 2008 मध्ये प्रत्येकी 5000 रुपये किमतीचे कार्पेट, जानेवारी 2009 मध्ये 9000 रुपये किमतीचे कार्पेट, ऑगस्ट 2009 मध्ये 5000 रुपये किमतीचे क्लोइझन चिल्बो, सप्टेंबर 2009 मध्ये 4000 रुपये किमतीचे दगडी शिल्प, मे 2000 मध्ये 4000 रुपये किमतीचे कार्पेट मिळाले होते तसेच 5000 रुपये किमतीची बाग आणि फुलांचे पेंटिंग. एप्रिल 2004 मध्ये 5000 रुपये किमतीच्या पोर्सिलेन वस्तूंचा संच भेटवस्तू म्हणुन मिळाल्या होत्या.
नोव्हेंबर 2012 मध्ये आणखी एक कार्पेट ज्याची किंमत 30,000 रुपये, याशिवाय जून 2011 मध्ये 4000 रुपये किमतीचा टी-सेट, मार्च 2012 मध्ये 5000 रुपये किमतीचा माँ सरस्वतीचा फोटो, 5000 रुपये किमतीचा सॅमसंगचा डिजिटल कॅमेरा पुढील महिन्यात मिळाला होता. 4500 रुपये किमतीचा मोत्याचा हार देखील भेटवस्तू म्हणून मिळाला होता.
त्याच वर्षी म्हणजे 2012 मध्ये जूनमध्ये 4000 रुपयांची फुलदाण्यांची 3 जोडी आणि त्याच रकमेची एक चटई मिळाली होती. सप्टेंबर 2012 मध्ये 4500 रुपयांचा डिनर सेट आणि पोर्सिलीन फुलदाण्यांची एक जोडी गिफ्ट म्हणूज मिळाली होती.
जून 2013 मध्ये 4800 रु. किमतीच्या बोस कंपनीच्या म्युझिक सिस्टमपासून ते पेजेटच्या लेडीज वॉचपर्यंत डॉ. मनमोहन सिंग यांनी 101 खास विदेशी भेटवस्तू मिळाल्या होत्या.
पीएमओने याबाबत अधिक माहिती देण्यास नकार दिला. बरेली स्थित वकिलाने दाखल केलेल्या आरटीआयला उत्तर देताना पीएमओ ने ही माहिती दिली होती.
विदेशी योगदान (भेटवस्तू किंवा सादरीकरणे स्वीकारणे किंवा राखणे) नियम 1978′ आणि ‘विदेशी योगदान (भेटवस्तू किंवा सादरीकरणे स्वीकारणे किंवा राखणे) नियम 2012’ अंतर्गत भेटवस्तू म्हणूज मिळालेल्या ह्या वस्तू पंतप्रधानांना आपल्याजवळ ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती.
डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांना भेट देण्यात आलेले बोस स्पीकर, म्युझिक साउंड सिस्टीम 20,000 रुपययांचे होते, तर पेजेट लेडीज रिस्ट वॉच 35,000 रुपये होते. एका कार्पेटची किंमत 30,000 रुपये होती. त्याला मिळालेल्या भेटवस्तूंची किंमत 300 रुपयांपासून ते 35,000 रुपयांपर्यंत होती.
Which 101 gifts did former Prime Minister Manmohan Singh receive?
महत्त्वाच्या बातम्या
- पंतप्रधान मोदींच्या कानपूरमधील सभेत दंगलीचा कट, सीसीटीव्हीमुळे उघड, समाजवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्याला अटक
- पुणे रेल्वे स्थानकावर मास्क न वापरल्याने तब्बल २,७०० जणांवर कारवाई
- ब्रेकिंग : मुंबईतील स्टेट बँक ऑफ इंडियावर गोळीबार
- प्रियांका गांधी म्हणाल्या, देश के लिए मिलकर लढेंगे जितेंगे!!; पण सुनील शास्त्री यांचा प्रतिसाद का नाही??