• Download App
    कोठे आहे मंदी? कोरोना संकटातही अवघ्या तीन महिन्यात पब्लीक इश्युद्वारे भारतात उभारले गेले १८ हजार कोटी रुपये|Where is the recession Even in the Corona crisis, Rs 18,000 crore was raised in India through public issue in just three months

    कोठे आहे मंदी? कोरोना संकटातही अवघ्या तीन महिन्यात पब्लीक इश्युद्वारे भारतात उभारले गेले १८ हजार कोटी रुपये

    कोरोनाच्या संकटामुळे अर्थव्यवस्थेवर परिणम झाला असे म्हटले जात असले तरी कोठे आहे मंदी असा प्रश्न विचारावा लागत आहे. कारण जानेवारी ते मार्च २०२१ या अवघ्या तीन महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही २२ पब्लीक इश्यु बाजारात आले. त्यांच्या माध्यमातून १८ हजार कोटी रुपये म्हणजे २.५ बिलीयन अमेरिकन डॉलर्स उभारण्यात आले.Where is the recession Even in the Corona crisis, Rs 18,000 crore was raised in India through public issue in just three months


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे अर्थव्यवस्थेवर परिणम झाला असे म्हटले जात असले तरी कोठे आहे मंदी असा प्रश्न विचारावा लागत आहे. कारण जानेवारी ते मार्च २०२१ या अवघ्या तीन महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही २२ पब्लीक इश्यु बाजारात आले.

    त्यांच्या माध्यमातून १८ हजार कोटी रुपये म्हणजे २.५ बिलीयन अमेरिकन डॉलर्स उभारण्यात आले.या पब्लीक इश्युमुळे भांडवली बाजाराला झळाळी आली आहे. हाच ट्रेंड पुढच्या काळातही चालू राहणार असल्यचा अर्थतज्ज्ञांचा अंदाज आहे.



    भारतात मार्च २०२० मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यावर लॉकडाऊन लावण्यात आला. त्यामुळे अर्थव्यवस्थेत मंदी आली. उद्योग-व्यापार बंद झाले. मात्र, त्यानंतर सरकारने भारतीय अर्थव्यवस्थेला २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजचा बुस्ण दिला.

    त्यामुळे बाजारात चैतन्य आले. यामुळेच विविध कंपन्यांनी आपले पब्लीक इश्यु बाजारात आणले. त्याच्या माध्यमातून १८ हजार कोटी रुपये उभारण्यात आले.

    इवाय इंडीयाज आयपीओ या कन्सल्टींग कंपनीच्या अहवालानुसार, किरकोळ बाजार, ग्राहकोपयोगी उत्पादने, स्वयंचलित वाहन उद्योग यामध्ये सर्वात जास्त गुंतवणूक जाली आहे. या कंपन्यांनीच सर्वात जास्त आयपीओ आणले आहेत.

    विशेष म्हणजे हे आयपीओ केवळ बड्या कंपन्यांचेच नाहीत तर लघू आणि मध्यम उद्योगांचेही आहे. पाच लघू आणि मध्यम उद्योगांनी हे आयपीओ बाजारात आणले आहेत. जगात आयपीओच्या संख्येत भारताचा क्रमांक नववा आला आहे.

    Where is the recession Even in the Corona crisis, Rs 18,000 crore was raised in India through public issue in just three months

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य