Sunday, 11 May 2025
  • Download App
    "व्हेन यू आर इन रोम, बी अ रोमन"..., नो... रोमन प्रार्थनेऐवजी मोदींचे स्वागत झाले संस्कृत शिवतांडव स्तोत्राने...!!|When you are in Rome, be a Roman" ..., no ... Instead of a Roman prayer, Modi was greeted with a Sanskrit Shivatandav hymn

    “व्हेन यू आर इन रोम, बी अ रोमन”…, नो… रोमन प्रार्थनेऐवजी मोदींचे स्वागत झाले संस्कृत शिवतांडव स्तोत्राने…!!

    वृत्तसंस्था

    रोम : “व्हेन यू आर इन रोम, बी अ रोमन”, अशी इंग्रजीत म्हण आहे. पण आज तिला इटलीच्या युवतींनी छेद दिला. रोम मध्ये त्यांनी रोमन प्रार्थना म्हणण्याऐवजी चक्क संस्कृत मधले शिवतांडव स्तोत्र म्हटले!!When you are in Rome, be a Roman” …, no … Instead of a Roman prayer, Modi was greeted with a Sanskrit Shivatandav hymn

    ही किमया घडली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इटली दौऱ्यात…!!



    मोदी सध्या रोम मध्ये g20 समिट साठी गेले आहेत. तेथे पियाजा गांधी म्हणजे गांधी चौकात शेकडो भारतीयांनी आणि इटालियन तरुण-तरुणींनी मोदींचे जोरदार स्वागत केले. मोदींच्या परदेश दौऱ्यात नेहमी घुमणारी “मोदी – मोदी” ची घोषणा यावेळी घुमलीच. यात काही वेगळे झाले नाही पण त्याहीपेक्षा मोदींच्या या दौर्‍याचे वेगळेपण ठरले ते काही इटालियन युवतींनी मोदींचे स्वागत शिवतांडव स्तोत्र म्हणून केल्याने…!!

    मोदी हे पियाजा गांधी म्हणजे गांधी चौकात येताच इटालियन युवतींनी शिवतांडव स्तोत्र म्हणायला सुरुवात केली. मोदी त्यांच्याकडे वळले आणि त्यांच्या समवेत ओम नमः शिवाय हा मोठा नामगजर केला. तिथे त्यांनी महात्मा गांधी यांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार घालून श्रद्धांजली वाहिली.

    त्यावेळी तिथल्या सर्व भारतीयांना आणि युवक-युवतींना उत्साहाचे उधाण आले होते. मोदींनी आपल्या इटली दौर्‍यात एक प्रकारे “व्हेन यु आर इन रोम, बी अ रोमन”, ही इंग्रजी म्हणच बदलून टाकली…!!

    When you are in Rome, be a Roman” …, no … Instead of a Roman prayer, Modi was greeted with a Sanskrit Shivatandav hymn

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!

    Icon News Hub