वृत्तसंस्था
नवी दिल्ली – Pegasus project media reports वरून संसदेत हंगामा करणाऱ्या विरोधकांना नवे IT मंत्री अश्विनी वैष्णव यांनी खणखणीत प्रत्युत्तर दिले आहे. फोन टॅपिंग, हेरगिरी या सगळ्या बातम्या कपोलकल्पित आणि धांदात खोट्या आहेत. भारतातल्या विद्यमान कायद्यानुसार आणि संस्थागत संतुलनानुसार असली बेकायदा हेरगिरी अशक्य आहे, असे अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले. When we look at this issue through the prism of logic, it clearly emerges that there is no substance
संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्याच्या आदल्याच रात्री बरे या बातम्या येतात. त्यावर आधी सोशल मीडियातून गदारोळ माजविला जातो आणि दुसऱ्या दिवशी संसदेत गोंधळ माजविला जातो, यातला घटनाक्रम आता जनतेला समजतो. केंद्राने तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे द्यायची तयारी केली आहे, म्हटल्यानंतर त्या प्रश्नांकडून लक्ष इतरत्र वळविण्यासाठी असले उद्योग केले जातात, अशी टीका अश्विनी वैष्णव यांनी केली.
ते म्हणाले, की राष्ट्रीय सुरक्षेच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर कायद्याच्या चौकटीत राहून इलेक्ट्रॉनिक माध्यमातून काही गुप्त माहिती गोळा केली जाते. हे सगळ्यांच देशांमध्ये चालते. पण त्याला हेरगिरी म्हणता येणार नाही. भारतात तर त्याची कायद्याने प्रस्थापित अशी यंत्रणा अस्तित्वात आहे. Sec 5(2) of Indian Telegraph Act, 1885 & Sec 69 of Information Technology Act 2000. या कायद्याच्या आधारे अशी गुप्त माहिती गोळा करणे शक्य आहे. त्यासाठी बाहेरच्या कोणत्याही कंपनीची गरज नाही, याकडे अश्विनी वैष्णव यांनी लक्ष वेधले.
कोणताही तर्क लावला तरी एक गोष्ट लक्षात येते की या बातम्यांमधून सनसनाटी निर्माण करण्याखेरीज दुसरे काहीही करण्यात आलेले नाही. या बातमीत ५० हजार फोन नंबर्सची हेरगिरी करण्यात आल्याची माहिती वरती देण्यात आली आहे. खाली त्याच बातमीत ही हेरगिरी नाही, असेही नमूद केले आहे. ही विसंगती लक्षात घेतली पाहिजे. या बातमीची अधिकृतता देखील अस्तित्वात नसल्याचे बातमीतच म्हटले आहे, याकडेही अश्विनी वैष्णव यांनी लक्ष वेधले.
पेगाससच्या बातम्या वॉट्स ऍपबाबत मागेही आल्या आहेत. त्यामध्ये देखील काहीही तथ्य नव्हते. त्यावेळी सगळ्या पक्षांच्या नेत्यांनी त्या बातम्यांचा इन्कार केला होता. केवळ भारतातल्या प्रस्थापित संस्थांना आणि लोकशाहीला बदनाम करण्यासाठी असल्या बातम्या पसरविण्यात येतात आणि त्यावर चर्चा घडविण्यात येते, असा आरोप देखील अश्विनी वैष्णव यांनी केला.
When we look at this issue through the prism of logic, it clearly emerges that there is no substance
महत्त्वाच्या बातम्या
- Pegasus Spyware : काय आहे पेगासिस स्पायवेअर, कसे हॅक केले जातात फोन? कुणी बनवले हे स्पायवेअर? वाचा सविस्तर…
- Monsoon Forecast : मुंबईसह कोकणात पुढील 5 दिवस अतिवृष्टीचा इशारा, हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी
- Phone Tapping हा देशाच्या स्वातंत्र्याला धोका, पंतप्रधान, गृहमंत्र्यांनी खुलासा करावा; संजय राऊतांची मागणी
- देशातले ४० कोटी लोक कोरोनाविरूध्दच्या लढाईत “बाहुबली” बनलेत; पंतप्रधानांचे गमतीशीर वक्तव्य
- आषाढी वारीवर निर्बंध; पंढरपूरात फक्त ४०० वारकऱ्यांना परवानगी; बंदोबस्ताला मात्र ३००० पोलीस तैनात; सुप्रिम कोर्टात आज सुनावणी