• Download App
    |When we introduced new Industrial policy, 3 families that exploited you used to mock who will come here.

    तीन परिवारांनी औद्योगिक धोरणाची खिल्ली उडविली तरी जम्मू – काश्मीरमध्ये गुंतवणूक वाढतीय; २०२२ मध्ये ५१००० कोटींची गुंतवणूक

    वृत्तसंस्था

    जम्मू  :  जम्मू – काश्मीरमधून ३७० कलम हटविल्यानंतर या केंद्रशासित प्रदेशासाठी मोदी सरकारने नवे औद्योगिक धोरण लागू केले. पण इथल्या तीन राजकीय परिवारांनी या धोरणाची खिल्ली उडविली. काश्मीरमध्ये गुंतवणूक करण्यासाठी कोण पुढे येणार असे ते परिवार म्हणाले. पण राज्यात १२००० कोटींची गुंतवणूक झाली आहे आणि आणखी ५१००० कोटींची गुंतवणूक येणार आहे, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली आहे.When we introduced new Industrial policy, 3 families that exploited you used to mock who will come here.

    तीन दिवसांच्या जम्मू – काश्मीर दौऱ्यात अमित शहांनी जम्मूच्या आयआयटीच्या नवीन भवनाचे उद्घाटन केले. त्यानंतर झालेल्या समारंभात ते बोलत होते. अमित शहा म्हणाले, की तीन परिवारांनी जम्मू – काश्मीरच्या जनतेची लूट केली.



    मोदी सरकारच्या नव्या औद्योगिक धोरणाची खिल्ली उडविली. या परिवारांनी खिल्ली उडविली तरी राज्यात गुंतवणूकीचा ओघ वाढला आहे. १२००० कोटींची गुंतवणूक झाली आहे आणि आणखी ५१००० कोटींची गुंतवणूक २०२२ पूर्वी होणार आहे. या मोठ्या गुंतवणूकीतूनच लाखो स्थानिक युवकांना रोजगाराचा लाभ होणार आहे.

    जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी आणि प्रेमनाथ डोगरा यांना अमित शहा यांनी श्रद्धांजली अर्पण केली. प्रेमनाथ डोगरा यांची आज जयंती आहे. त्यांचे योगदान कोणीही विसरू शकत नाही, असे ते म्हणाले.

    अनेकांनी राज्यातील हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित केला. आम्ही देखील हिंसाचारमुक्त काश्मीरचेच स्वप्न पाहतो. पण २००४ ते २०१४ या १० वर्षांतील आकडेवारी नीट पाहा. इथे दहशतवाद्यांनी नंगानाच घातला होता. सुरक्षा दलावर दगडफेकीच्या घटना नित्याच्या होत्या.

    आता दहशतवाद्यांनी हल्ला केला गरीब लोक मारले की एन्काऊंटर होतात आणि दहशतवादी मारले जातात, याकडे अमित शहांनी लक्ष वेधले आहे. जम्मू – काश्मीरमध्ये संपूर्ण शांतता नांदावी असे वातावरण आम्हाला निर्माण करायचे आहे, असे ते म्हणाले.

    जम्मूतील गुरखा, वाल्मीकी समूदायाला विकासाच्या, शिक्षणाच्या योजनांपासून आधीच्या सरकारांनी वंचित ठेवले होते. आता त्यांना मुक्तपणे शिक्षण घेता येते आहे. त्यांना सरकारी नोकरीपासून कोणी वंचित ठेवू शकत नाही. त्यांच्याशी भेदभाव करण्याचा जमाना संपला आहे, असे राज्यपाल मनोज सिन्हा यांनी स्पष्ट केले.

    When we introduced new Industrial policy, 3 families that exploited you used to mock who will come here.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य