• Download App
    केंद्रीय कायदा मंत्री पहिल्यांदा भेटले तेव्हा सरन्यायाधीशांना वाटले कोणी कॉलेज तरुणच आहे!|When the Union Law Minister first met, the Chief Justice thought someone was a college youth!

    केंद्रीय कायदा मंत्री पहिल्यांदा भेटले तेव्हा सरन्यायाधीशांना वाटले कोणी कॉलेज तरुणच आहे!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : केंद्रीय कायदा मंत्री किरण रिजीजू यांना चक्क सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांनी कॉँप्लिमेंट दिली आहे. कामावरून त्याबरोबरच त्यांच्या वयावरूनही. किरण रिजीजू पहिल्यांदा आपल्याला भेटले तेव्हा वाटले की कोणी कॉलेज तरुणच आहे,When the Union Law Minister first met, the Chief Justice thought someone was a college youth!

    असे खुद्द रमणा यांनीच सांगितले. रिजीजू हे तरुण आणि धडाडीचे असल्याच्या शब्दांत त्यांचे कौतुकही केले. मात्र, वयाचा फायदा घेऊन त्यांच्यावर दबाव आणला नसल्याचेही सरन्यायाधीश मिश्किलपणे म्हणाले.



    नवी दिल्ली येथे एका कार्यक्रमात रमण आणि रिजीजू एका व्यासपीठावर होते. यावेळी बोलताना रमण म्हणाले, कॉलेजिअमने देशातील १२ उच्च न्यायालयांमध्ये न्यायाधीश नियुक्तीसाठी ६२ नावांची शिफारस केली आहे. या नावांवर सरकारकडून लवकरात लवकर कार्यवाही होण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

    अलाहाबाद, राजस्थान, कलकत्ता, झारखंड, जम्मू आणि काश्मीर, मद्रास, मध्य प्रदेश, कर्नाटक, पंजाब आणि हरियाणा, केरळ, छत्तीसगड आणि आसाम या राज्यांच्या न्यायाधीशांच्या नियक्ती होणार आहेत.रमण म्हणाले, सर्वोच्च न्यायालयातील नऊ न्यायाधीशांच्या नियुक्तीमध्ये सरकारने तातडीने कार्यवाही करेल. तरुण आणि धडाडीचा कायदा मंत्री असल्याने वेगवान कार्यवाहीची अपेक्षा आहे.

    रिजीजू म्हणाले, प्रस्तावित न्यायाधीशांच्या नावांविषयी बोलू शकत नाही. पण सरकार यावर सकारात्मकपणे तातडीने कार्यवाही करेल.न्यायालयातील पायाभूत सुविधांच्या समस्यांविषयी आठवड्यात कायदा मंत्र्यांसमोर अहवाल सादर केला जाईल. सरकारकडून या समस्यांचे तातडीने निराकारण होईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

    माझ्याकडे कायद्याची पदवी आहे. पण वकील म्हणून प्रॅक्टीस करण्याचा अनुभव नाही, असे रिजीजू यांनी मला पहिल्याच भेटीत सांगितले होते. मात्र, त्यामुळेच न्यायाधीशांविरुद्ध पूर्वग्रह बाळगणार नाही, असेही रमण यांनी सांगितले.

    ग्रामीण भागांमध्ये ऑनलाईन सुनावणीसाठी संपर्क साधण्यास अडचणी येत असल्याने अनेक वकीलांनी काम मिळत नसल्याचे सांगून रमण म्हणाले, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सध्या सुनावण्या सुरू आहेत. मोठ्या वकीलांकडे सुविधा आणि वेळ असल्याने तेच जास्तीत जास्त सुनावण्यांना हजर राहत आहेत. मात्र, त्यामुळे असमानता निर्माण होत असून भविष्यासाठी हे धोकादायक असल्याचेही रमण यांनी सांगितले.

    When the Union Law Minister first met, the Chief Justice thought someone was a college youth!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!