वृत्तसंस्था
इम्फाळ : टोकियो ऑलिंपिकमध्ये वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक पटकावणारी भारतीय वेटलिफ्टर मीराबाई चानू हिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कशाप्रकारे मदत केली की ज्यामुळे ती ऑलिम्पिकमध्ये पोहोचू शकली आणि भारताला पदक मिळवू शकली याची कहाणी मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी सांगितली आहे. When PM Modi learnt about her back pain, he intervened & expenses were borne by the Centre.
ते म्हणाले, की मीराबाई चानू हिला पाठदुखी होती. तिचे मसल ऑपरेशन करणे गरजेचे होते. हा मेसेज पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोहोचला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः लक्ष घालून मीराबाई चानू हिची व्यवस्थित माहिती घेतली आणि तिला अमेरिकेत उपचारासाठी पाठवले तिथे तिच्या सरावाची व्यवस्था करून घेतली. तिचे ऑपरेशन व्यवस्थित पार पडले. सरावही झाला आणि ती टोकियो ऑलिम्पिकपर्यंत पोहोचली. तिने भारताला वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक मिळवून दिले. ही गोष्ट तिने मला तिच्या एका सत्कार समारंभात स्वतः सांगितली.
बिरेन सिंग पुढे म्हणाले, की हे सगळे ऐकून तर मी थक्क झालो की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः लक्ष घालून मीराबाईला मदत केली. ती मदत तिच्या पर्यंत पोहोचेल. तिच्यावर उपचार होतील. तिचा सराव चालू राहील याची काळजी स्वतः मोदींनी घेतली. शिवाय आपले नाव त्यावेळी त्यांनी कोठेही पुढे येऊ दिले नाही. अशीच मदत त्यांनी अन्य एका असली केला केली आहे.मी त्याचे नाव सांगणार नाही. पण देशाचे पंतप्रधान आपल्या खेळाडूंची कशी काळजी घेतात त्यांना पदक मिळवण्यासाठी कसे प्रोत्साहन देतात याचे हे उत्तम उदाहरण आहे, असे बिरेन सिंग यांनी सांगितले.
बिरेन सिंग हे पंतप्रधानांना दरम्यानच्या काळात भेटले. त्यावेळी त्यांनी मीराबाई चानू तिने सांगितलेल्या गोष्टीचा उल्लेख केला. तेव्हा मोदी फक्त हसले आणि बिरेन सिंग यांच्या पाठीवर थाप मारली. “हा क्षण माझ्यासाठी भारावलेला आणि मोलाचा होता,” असे बिरेन सिंग म्हणाले.