• Download App
    माझी मुलगी कोरोना वॉर्डात डॉक्टर होती त्यावेळी मला थाळी-टाळीचे महत्व पटले, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी विरोधकांना फटकारले|When my daughter was a doctor in Corona ward, I realized the importance of plate-clapping, said Union Health Minister Mansukh Mandvia

    माझी मुलगी कोरोना वॉर्डात डॉक्टर होती त्यावेळी मला थाळी-टाळीचे महत्व पटले, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी विरोधकांना फटकारले

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : मी भारत सरकारचा मंत्री आहे, याआधी मी एका मुलीचा बाप आहे. माझी मुलगी ज्यावेळी कोरोना संकट काळात डॉक्टर म्हणून कोविड वॉर्डात काम करत होती. अशावेळी तिच्या आई-वडिलांची काय परिस्थिती असते?When my daughter was a doctor in Corona ward, I realized the importance of plate-clapping, said Union Health Minister Mansukh Mandvia

    माझ्या मुलीने स्वत:हून सांगितले होते की ती त्या वॉर्डात काम करेल आणि तिने काम सुरू केले. त्यावेळी मला थाळी-टाळीचे महत्व पटले होते. आम्हाला धैर्य मिळाल, अशा शब्दांत केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी विरोधकांना फटकारले.



    कोरोना संकटात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला टाळी-थाळी वाजवण्याचे आवाहन केले होते, त्यावरून विरोधकांकडून सातत्याने मोदी सरकारवर टीका करण्यात आली. मनसुख मंडाविया म्हणाले, देशाच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उभे असलेल्या पोलिसांना प्रोत्साहन देण्यासाठी, थाळी व टाळ्या वाजवल्या गेल्या

    . बरेच सदस्य म्हणाले की, केंद्र सरकार कोरोना मृत्यूदराची आकडेवारी लपवत आहे. मात्र राज्य सरकार जे देते तेच केंद्र सरकार प्रकाशित करते. सरकारने कोणालाही कमी आकडेवारी देण्यास सांगितले नाही.

    भारतासारखा देश कोणावरही अवलंबून राहू शकत नाही, त्यामुळे पंतप्रधानांनी बायोटेक्नॉलॉजी विभाग आणि वैज्ञानिकांना त्वरित लसीवर काम करण्याचे निर्देश दिले. भारताने 123 देशांना औषध पुरवठा केला होता, त्यापैकी 64 देशांनी भारताचे आभार मानले होते.

    ज्यावेळी कोरोनाटी दुसरी लाट चालू होती आणि आम्हाला औषधांची बरीच गरज होती, त्यावेळी अमेरिकेने म्हटले होते की, भारताने आम्हाला त्वरित मदत केली होती, हे आपण विसरू शकत नाही.

    When my daughter was a doctor in Corona ward, I realized the importance of plate-clapping, said Union Health Minister Mansukh Mandvia

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य