Whatsapp : व्हॉट्सअॅपने दिल्ली उच्च न्यायालयात भारत सरकारविरोधात एक खटला दाखल केला आहे, ज्यामध्ये आजपासून लागू होणारे नवीन आयटी नियम रोखण्याची मागणी करण्यात आली आहे. मंगळवारी, 25 मे रोजी ‘व्हॉट्सअॅप विरुद्ध भारत सरकार’ खटला दाखल करण्यात आला. कंपनीने म्हटले की, नवीन नियमांमुळे वापरकर्त्यांच्या प्रायव्हसीवर परिणाम होईल. whatsapp sues indian government Says new IT rules will eliminate privacy Of Users
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : व्हॉट्सअॅपने दिल्ली उच्च न्यायालयात भारत सरकारविरोधात एक खटला दाखल केला आहे, ज्यामध्ये आजपासून लागू होणारे नवीन आयटी नियम रोखण्याची मागणी करण्यात आली आहे. मंगळवारी, 25 मे रोजी ‘व्हॉट्सअॅप विरुद्ध भारत सरकार’ खटला दाखल करण्यात आला. कंपनीने म्हटले की, नवीन नियमांमुळे वापरकर्त्यांच्या प्रायव्हसीवर परिणाम होईल.
वास्तविक, 25 फेब्रुवारी 2021 रोजी केंद्र सरकारने इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाच्या वतीने डिजिटल कंटेंटच्या रेग्युलेशनसाठी 3 महिन्यांच्या आत अनुपालन अधिकारी, नोडल अधिकारी इत्यादींची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले होते. या सर्वांचे कार्यक्षेत्र भारतात असणे गरजेचे आहे. सरकारने दिलेल्या आदेशानुसार कंपन्यांना अनुपालन अधिकारी नियुक्त करावे लागतील आणि त्यांचे नाव व काँटॅक्ट अॅड्रेस भारताचा असणे अनिवार्य करण्यात आले आहे.
चॅट ‘ट्रेस’ करणे म्हणजे प्रत्येक मेसेजची फिंगरप्रिंट ठेवण्यासारखे
जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणार्या व्हॉट्सअपच्या प्रवक्त्याने सांगितले की, “मेसेजिंग अॅपला चॅट ‘ट्रेस’ करण्यास सांगणे म्हणजे व्हॉट्सअपवर पाठविलेल्या प्रत्येक मेसेजची फिंगरप्रिंट विचारण्यासारखेच आहे, हे एंड-टू-एंड एन्क्रिप्शन खंडित करेल, यामुळे लोकांचे प्रायव्हसीचे अधिकार कमकुवत होतील. “व्हॉट्सअप सातत्याने सिव्हिल सोसायटी आणि जगभरातील तज्ज्ञांसोबत मिळून अशा गोष्टींचा विरोध करत आला आहे ज्यामुळे त्यांच्या वापरकर्त्यांच्या प्रायव्हसीचे उल्लंघन होईल.” प्रवक्त्याने सांगितले की, यादरम्यान आम्ही लोकांच्या सुरक्षिततेच्या उद्देशाने व्यावहारिक उपायांवर भारत सरकारसोबत राहू. यात वैध कायदेशीर विनंतीला उत्तर देण्याचाही समावेश आहे.”
फेसबुकने काय म्हटले?
महत्त्वाचे म्हणजे मंगळवारी गुगल आणि फेसबुकने म्हटले की, ते नवीन नियमांचे अनुसरण करण्याचा प्रयत्न करत आहेत. आयटीच्या नियमांनुसार आम्ही ऑपरेशनल प्रक्रियेची अंमलबजावणी आणि कार्यक्षमता सुधारण्याच्या दिशेने काम करत आहोत, असे फेसबुकने म्हटले होते. “आम्ही आमच्या व्यासपीठावर लोकांच्या स्वतंत्रतेने व सुरक्षितपणे व्यक्त करण्याच्या क्षमतेसाठी वचनबद्ध आहोत.” कंपनीने म्हटले आहे की, “सरकारच्या निर्देशांचे पालन करण्याची त्यांची इच्छा आहे जेणेकरून भविष्यात ते सरकारसमवेत एकत्र काम करू शकतील. कंपनीने हेदेखील स्पष्ट केले आहे की ते त्यांच्या वापरकर्त्यांच्या प्रायव्हसीची पूर्ण काळजी घेतील.”
whatsapp sues indian government Says new IT rules will eliminate privacy Of Users
महत्त्वाच्या बातम्या
- राष्ट्रीय लोक दलाच्या अध्यक्षपदी उच्चविद्याविभूषित जयंत चौधरी यांची निवड, तिसऱ्या पिढीकडे नेतृत्व
- कोरोना शिरू नये म्हणून गुजरातमध्ये मिरवणुकीचे आयोजन, ८० जणांना अटक
- मॉडर्ना कंपनीची सिंगल डोस लस देशात पुढील वर्षी उपलब्ध होणार
- केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आकडेवारी नको तर लस पुरवावी, गेहलोत यांची टीका
- फरार मेहुल चोक्सी अँटीग्वातून गायब, क्युबात आश्रय घेतल्याची शक्यता