सीईआरटी-इन’ चा सावधगिरीचा इशारा ; कंपनीकडून सुरक्षिततेची ग्वाहीWhats app urged uses for updating app
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : व्हॉट्स ॲपच्या जुन्या व्हर्जनमध्ये दोन व्हायरसनी शिरकाव केला आहे. भारतीय सायबर क्षेत्राला मार्गदर्शन करणाऱ्या ‘सीईआरटी-इन’ या तंत्रज्ञान संस्थेने याबाबत सूचना जारी केल्या आहेत. त्यात संवेदनशील माहिती उघड होण्याबाबत युजरला सावध करण्यात आले आहे.
‘सीईआरटी-इन’ने व्हॉट्स ॲप आणि व्हॉट्स ॲप बिझनेसच्या व्ही२.२१.४.१८ या ॲंड्रॉईड व्हर्जनवर आणि व्ही२.२१.३२ या आयओएस व्हर्जनमध्ये दोन व्हायरस आढळल्याने उच्च सावधगिरीचा इशारा दिला होता. त्याचप्रमाणे, युजरला गुगल प्ले स्टोअर किंवा आयओएस ॲप स्टोअरमधून व्हॉट्स ॲप अपडेट करण्याचाही सल्ला देण्यात आला आहे.
व्हॉट्स ॲपने अधिकृत निवेदनात हे स्पष्टीकरण दिले आहे. युजरचे मेसेज सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही संशोधकांसह नियमितपणे काम करतो. आम्हाला जुन्या किंवा कालबाह्य सॉफ्टवेअरवर दोन व्हायरसचे अस्तित्व आढळले. मात्र, त्यांचा वापर झाल्यावर विश्वास ठेवण्याचे काहीही कारण नाही.
व्हॉट्स ॲप सुरक्षित असून युजरच्या सुरक्षेसाठी ‘एंड टू एंड इनक्रिप्शन’ यापुढेही सुरूच राहिल, असेही व्हॉट्स ॲपकडून स्पष्ट करण्यात आले आहे.