वृत्तसंस्था
अनुपशहर : उत्तर प्रदेशात जे अखिलेश यादव आपल्या वडिलांचे आणि काकांचे ऐकत नाहीत ते तुमचे काय ऐकणार जयंत बाबू??, असा खोचक सवाल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज केला.अनूपशहर मध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी अमित शहा यांनी अखिलेश यादव आणि जयंत चौधरी यांच्या समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय लोकदलाच्या युतीवर टीकास्त्र सोडले.What will Jayant Babu listen to if he doesn’t listen to his father and uncle ??; Amit Shah’s Jayant Chaudhary – Akhilesh
अमित शहा म्हणाले, की परवाच अखिलेश यादव यांनी पत्रकार परिषदेत जयंत चौधरी यांना आपल्या शेजारी बसवून घेतले होते. त्यामुळे जयंत चौधरींना वाटेल की समाजवादी पक्षाचे सरकार उत्तर प्रदेशात आले तर अखिलेश यादव हे आपले ऐकतील. पण जयंत बाबू हे विसरले की जे अखिलेश यादव आपल्या वडिलांचे आणि काकांचे ऐकत नाहीत, ते त्यांचे काय शकतील?, ते असा टोला त्यांनी लगावला.
अमित शहा म्हणाले, की समाजवादी पक्षाचे सरकार उत्तर प्रदेशात येण्याची सुतराम शक्यता नाही. पण चुकून माकून अखिलेश यादव यांचे सरकार बनलेच, तर दुसऱ्या – तिसऱ्या दिवशी ते जयंत चौधरी यांना बाजूला करून त्यांच्या जागेवर आझम खान यांना आणून बसवतील, याची जयंत चौधरी यांनी खात्री बाळगावी!!
गेल्या काही दिवसांपासून अमित शहा हे जयंत चौधरी यांना राजकीयदृष्ट्या टार्गेट करताना दिसत आहेत. जयंत चौधरी हे चांगले नेते आहेत परंतु त्यांनी चुकीचा मार्ग निवडून अखिलेश यादव यांच्याबरोबर युती केली आहे. त्यामुळे त्यांच्याच पक्षाचे मोठे नुकसान होत आहे, असे टीकास्त्र अमित शहा यांनी सोडले होते. आज पुन्हा एकदा अनुपशहर मध्ये अमित शहा यांनी अखिलेश यादव – जयंत चौधरी जोडगोळीवर टीकास्त्र सोडले आहे.
What will Jayant Babu listen to if he doesn’t listen to his father and uncle ??; Amit Shah’s Jayant Chaudhary – Akhilesh
महत्त्वाच्या बातम्या
- उमेदवारी अर्ज दाखल करताना योगी सरकारचे कॅबिनेट मंत्री सिद्धार्थनाथ यांच्यावर हल्ला, आरोपींकडून ब्लेड जप्त
- BMC Budget : बीएमसी आयुक्तांनी सादर केला ४५,९४०.७८ कोटींचा अर्थसंकल्प, डिजिटल जाहिरातीतून कमाईची योजना
- आर्ट फिल्म्सची नॉन ग्लॅमरस नायिका दीप्ती नवल; आज 70 वा वाढदिवस
- बीएमसीचा ३३७० कोटींचा वार्षिक अर्थसंकल्प सादर, मुंबईत दोन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा बांधण्याची तरतूद