• Download App
    राकेश झुनझुनवालांच्या 46 हजार कोटींच्या संपत्तीचे नेमके होणार काय??, कोण वारस??|What will happen to Rakesh Jhunjhunwala's wealth of 46 thousand crores??, who will be the heir

    राकेश झुनझुनवालांच्या 46 हजार कोटींच्या संपत्तीचे नेमके होणार काय??, कोण वारस??

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : भारताचे “वॉरेन बफेट” राकेश झुनझुनवालांचे रविवारी वयाच्या 62 व्या वर्षी निधन झाले. आता त्यांच्या 40000 कोटी रुपयां पेक्षा अधिकच्या गुंतवणुकीचे नेमके काय होणार??, असा सवाल तयार झाला आहे. काही उत्तरे राकेश झुनझुनवाला यांनी आधीच देऊन ठेवली आहेत.What will happen to Rakesh Jhunjhunwala’s wealth of 46 thousand crores??, who will be the heir

    अकासा एअरच्या एअरलाइनसह त्यांची अनेक कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक आहे. ही कंपनी 7 ऑगस्ट 2022 लाच लॉन्च झाली आहे. राकेश झुनझुनवालांच्या मृत्यूमुळे अकासाच्या संचलन संकटात सापडेल काय? त्यांचे 46000 कोटींचे संपत्तीचे काय होणार ती कोण सांभाळणार सांभाळणार? असे विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.



    गुंतवणूकीचा आवाका

    राकेश झुनझुनवाला यांना भारताचे वॉरेन बफेट म्हणतात. ते देशातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदार होते. त्यांनी 1985 मध्ये 5 हजार रुपयांसह गुंतवणुकीला सुरूवात केली. त्यावेळी बीएसई इंडेक्स 150 वर होता. झुनझुनवाला यांनी 2003 मध्ये पत्नी रेखाच्या नावाने स्वतःची स्टॉक ट्रेडिंग कंपनी रेयर एटरप्रायझेसची स्थापना केली होती.

    राकेश योग्य निर्णय, संभाव्य मल्टीबॅगरमधील गुंतवणूक आणि गरजेनुसार पोर्टफोलियोत बदल करत होते. त्यामुळे ते शेअर मार्केटमध्ये “बिग बुल” नावाने संबोधले जात होते.
    एक्सचेंजवरच्या माहितीनुसार, जून क्वार्टरमध्ये राकेश झुनझुनवाला यांच्याकडे 44 कंपन्यांचे शेअर्स होते. या 44 कंपन्यांत अनंत राज, टाटा मोटर्स, टायटन, फेडरल बँक, नाजार, स्टार हेल्थ सारख्या कंपन्यांचा समावेश आहे.

    झुनझुनवाला एकेकाळी स्टॉक मार्केटमध्ये बेअरिश अर्थात अस्वल म्हणून ओळखले जात. त्यांनी 1992 साली हर्षद मेहता घोटाळ्याचा खुलासा झाल्यानंतर शॉर्ट सेलिंग करून मोठा नफा मिळवला. 1990 च्या दशकात भारतीय स्टॉक मार्केटमध्ये अनेक कार्टेल होते.

    विमान व्यवसाय

    राकेश झुनझुनवाला यांनी अकासा एअरलाइनमध्ये $35 दशलक्ष किंवा सुमारे 278 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. या एअरलाइनमध्ये त्यांची सुमारे 40% हिस्सेदारी आहे. इंधनाच्या किमती खूप वाढल्या आहेत आणि अनेक कंपन्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे अशा वेळी त्यांनी एअरलाइन व्यवसायात प्रवेश केला.

    मात्र, अकासा एअरच्या लॉन्चिंगवेळी ते म्हणाले होते, ‘अनेकांच्या मनात प्रश्न आहेत. मी एअरलाइन का सुरू केली? त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देण्याऐवजी मी असे म्हणेन की, मी नापास होण्यास तयार आहे. प्रयत्न न करण्यापेक्षा प्रयत्न केल्यानंतर अपयशी होणे चांगले, असे ते म्हणाले होते.

    7 ऑगस्ट रोजी ते अकासा एअरच्या लॉन्चिंगवेळी मुंबई विमानतळावर ते व्हिलचेअरवर दिसले होते. या एअरलाइनसह त्यांची अनेक कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक आहे.

    त्यांचा व्यवसाय कोण सांभाळणार?

    राकेश झुनझुनवाला यांनी खूप मोठे साम्राज्य मागे सोडले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी रेखा झुनझुनवाला, मुलगी निष्ठा झुनझुनवाला, मुले आर्यमन आणि आर्यवीर झुनझुनवाला असा परिवार आहे. राकेश झुनझुनवाला यांची एकूण संपत्ती सुमारे 46 हजार कोटी रुपये आहे.

    झुनझुनवाला आणि त्यांच्या पत्नीची अकासा एअरमध्ये 40% पेक्षा जास्त भागीदारी आहे. ते स्टार हेल्थ अलाईड इन्शुरन्सचे प्रमोटर देखील आहेत. जून तिमाहीत, यात त्यांची हिस्सेदारी सुमारे 17.46% होती. अशा परिस्थितीत आता हे साम्राज्य सांभाळण्याची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या पत्नीवर आली आहे. आता त्या आपल्या मुलांसोबत हे काम सांभाळतील. झुनझुनवाला यांच्या जाण्याने त्यांच्या विमानसेवा आणि अन्य व्यवसायासमोर आता मोठी आव्हाने येऊ शकतात.

    What will happen to Rakesh Jhunjhunwala’s wealth of 46 thousand crores??, who will be the heir

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य