• Download App
    ओडिशा रेल्वे अपघाताचा प्राथमिक रिपोर्ट नेमके काय सांगतो??; अपघात की घातपात?? What the Odisha train accident preliminary report says exactly

    ओडिशा रेल्वे अपघाताचा प्राथमिक रिपोर्ट नेमके काय सांगतो??; अपघात की घातपात??

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : ओडिशातील बालासोर जवळ झालेल्या भीषण रेल्वे अपघाताचा “प्राथमिक तपास अहवाल” रेल्वे अधिकार्‍यांनी दिला आहे. अर्थात हा अहवाल अंतिम नाही. अजून बराच तपास आणि चौकशी होणे अपेक्षित आहे. या अपघाताची सखोल चौकशी आणि तपास करण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देऊन कोणत्याही स्थितीत यात दोषी आढळलेल्यांना कठोरातील कठोर सजा देण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. What the Odisha train accident preliminary report says exactly

    रेल्वे अधिकाऱ्यांच्या प्राथमिक तपास अहवालानुसार, JIR म्हणते की SM पॅनेलनुसार UP मेन लाईनसाठी सिग्नल सेट केले होते, पण पॉइंट्स UP लूप लाईनवर सेट केले होते. LP/ALP कोणत्याही प्रकारे हे टाळू शकले नसते. कदाचित सोलेनॉइड खराब झाले आहे किंवा ही तोडफोड झाली आहे.

    आणखी सखोल तपास आणि चौकशीनंतरच रेल्वे अपघाता संदर्भात काही ठोस निष्कर्ष काढता येतील, असे रेल्वे अधिकारी यांचे म्हणणे आहे.

    अपघाताचा मोठा परिणाम; वाचा आकडे!!

    या भीषण रेल्वे अपघातात 288 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. अद्याप घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घटनास्थळी भेट देऊन सूचना दिल्या आहेत तसेच त्यांनी रुग्णालयांमध्ये जाऊन जखमींची विचारपूस केली आहे.

    या अपघातामुळे रेल्वे सेवेवर मोठा परिणाम झाला असून तो असा :

    •  58 लघु आणि दीर्घ पल्ल्याच्या गाड्या रद्द
    •  81 लघु आणि दीर्घ पल्ल्याच्या गाड्यांचे बदलले मार्ग
    •  10 गाड्या शॉर्ट टर्मिनेट
    •  अपघातात 288 मृत 800 जणांवर उपचार सुरू
    •  जखमींच्या मदतीसाठी 3000 युवकांचे रक्तदान
    •  केंद्र आणि राज्य सरकारे मिळून मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखांची मदत, तर जखमींना 5 लाखांची मदत

    What the Odisha train accident preliminary report says exactly

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य