विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आपले मोठे भाऊ म्हणणारे कॉँग्रेसचे नेते नवज्योत सिंह सिध्दू यांच्यावर चोहोबाजुने टीका होत आहे. हजारो भारतीयांचे प्राण घेणारा यांचा मोठा भाऊ आहे. गांधी परिवाराचे समर्थन असलेल्या नवज्योत सिंह सिध्दू यांच्यासारख्याकडून आणखी अपेक्षा तरी काय ठेवणार असे म्हटले जात आहे What more could one expect from Navjyotsingh Sidhu
पाकिस्तानमध्ये करतारपूर परियोजनेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याशी बोलताना सिध्दू यांनी इम्रान खान यांना आपले मोठे भाऊ असल्याचे म्हटले होते. याबाबत चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी ट्विट करून म्हटले आहे की एक दहशतवादी ज्यांनी हजारो भारतीयांचे प्राण घेतले तो यांचा मोठा भाऊ आहे. त्यांच्याकडू आणखी अपेक्षा तरी काय ठेवणार?
- नवज्योत सिंग सिध्दूंच्या नेतृत्वाखालची काँग्रेस म्हणजे क़ॉमेडी शो; हरससिमरत कौर बादल यांचे टीकास्त्र
प्रसिधद पत्रकार अमिश देवगण यांनी म्हटले आहे की नवज्योत सिंह सिध्दू पाकिस्तानला गेल्यावर इम्रान खान यांची स्तुती करणार नाहीत असे होऊच शकणार नाही.भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी म्हटले आहे की
पाकिस्तानला गेल्यावर सिध्दू इम्रान खान यांचे महिमामंडन करणार नाहीत असे होऊच शकत नाही. सिध्दू यांनी इम्रान खान यांना मोठा भाऊ म्हणत त्यांच्यावर प्रेम करतो असे म्हटले आहे. कोट्यवधी भारतीयांसाठी हे चिंताजनक आहे.
What more could one expect from Navjyotsingh Sidhu
महत्त्वाच्या बातम्या
- नवज्योत सिंग सिद्धूंचे पाकिस्तान प्रेम पुन्हा उफाळले, म्हणाले- इम्रान खान माझे मोठे भाऊ, मला खूप प्रेम दिले!
- हिंदी बिग बॉस मध्ये अभिजित बिचुकलेची होणार एन्ट्री
- कृषी कायदे रद्द घेतलेत, आता सीएए – एनआरसी हे कायदे मागे घ्या; मौलाना अर्षद मदानींची मोदींकडे मागणी
- “कामगारांचे निलंबन करूनही प्रश्न मिटत नसेल तर….” ; अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर साधला निशाणा