• Download App
    इंटरनॅशनल बुलियन एक्स्चेंज म्हणजे काय‌?, यावरून आता भारतात निश्चित होणार सोन्याचे दर What is the International Bullion Exchange, what gold rates will be fixed in India%

    इंटरनॅशनल बुलियन एक्स्चेंज म्हणजे काय‌?, यावरून आता भारतात निश्चित होणार सोन्याचे दर

    भारतात सोन्याचा सर्वाधिक वापर आहे. म्हणून या एक्स्चेंजला एक महत्त्वाचे पाऊल म्हणून संबोधले जात आहे. येथे निश्चित केलेल्या किमती सोन्याचे दर ठरवतील, जे आंतरराष्ट्रीय मानकांनुसार असतील. What is the International Bullion Exchange, what gold rates will be fixed in India 


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : बुधवारी इंटरनॅशनल फायनान्शिअल सर्व्हिसेस सेंटर अथॉरिटी (IFSCA) ने इंटरनॅशनल बुलियन एक्स्चेंजची पायलट रन लॉन्च केली आहे. 1 ऑक्टोबर 2021 रोजी जेव्हा IFSCA चा स्थापना दिवस असेल, तो दिवस विनिमय प्राधिकरणाच्या बुलियन एक्स्चेंज 2020 अंतर्गत येईल.

    11 डिसेंबर 2020 रोजी या संदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली होती.  फेब्रुवारी 2020 मध्ये जेव्हा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करण्यात आला, तेव्हाही हे जाहीर करण्यात आले होते.

    हे एक्स्चेंज भारतातील सोन्याच्या आयातीसाठी प्रमुख प्रवेशद्वार मानले जाईल. असे मानले जाते की, आता जे काही सोने देशात आयात केले जाईल, ते या विनिमयानुसार येईल.  भारतात सोन्याचा वापर सर्वाधिक आहे. म्हणून, या एक्स्चेंजला एक महत्त्वाचे पाऊल म्हणून संबोधले जात आहे आणि येथे निश्चित केलेल्या किमती सोन्याचे दर ठरवतील, जे आंतरराष्ट्रीय मानकांनुसार असतील.



    या एक्सचेंजनंतर सोन्याच्या योग्य किंमती निश्चित केल्या जातील. सध्या वेगवेगळ्या प्रकारे सोने आयात केले जाते. भारत सोन्याचा सर्वात मोठा आयातदार देश आहे. यामुळे दुबईहून भारतात सोन्याच्या व्यापाराचा मोठा भाग स्थलांतरित होण्याची अपेक्षा आहे. असे एक्स्चेंज लंडन, शांघाय आणि तुर्कीमध्येही आहे. हे एक्स्चेंज सोन्याच्या जगात काय चालले आहे, यावर लक्ष ठेवण्याचे काम करेल.

    गोल्ड एक्स्चेंजच्या आगमनानंतर सोन्याचे व्यवहार स्टॉकप्रमाणे सुरू होतील.  पूर्वी काही काम यामध्ये आऊटसोर्स केले जाणार होते, पण आता सर्व काही सेबीच्या देखरेखीखाली केले जाईल, असा निर्णय घेण्यात आला आहे.  एक इलेक्ट्रॉनिक सोन्याची पावती असेल, ज्याद्वारे सोन्याच्या एक्सचेंजवर ट्रेडिंग केले जाईल. असे मानले जाते की, गोल्ड एक्सचेंजच्या अस्तित्वामुळे किंमत आणि गुणवत्तेबाबत पारदर्शकता वाढेल.

    एका रिपोर्टनुसार, ट्रेडिंग कंपनी एक्सचेंजवर प्रथम व्हॉल्टमध्ये सोने जमा करेल. त्यानंतर व्हॉल्ट मॅनेजर सोन्याच्या बदल्यात इलेक्ट्रॉनिक गोल्ड पावती (ईजीआर) जारी करेल. ईजीआर एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध होण्यास सक्षम असेल म्हणजेच ईजीआर खूप महत्त्वाचे असेल आणि याद्वारे आपण ट्रेंड करू शकाल. सूचीबद्ध केल्यानंतर ईजीआरचा शेअरसारखा व्यवहार केला जाईल.  ईजीआरचे क्लिअरिंग आणि सेटलमेंटचे काम शेअर्सप्रमाणे केले जाईल. लॉट 5 ग्रॅम ते 1 किलोपर्यंत उपलब्ध असेल, ज्यामध्ये ट्रेडिंग करता येईल.

    भारतात 22,000 टन सोने

    या एक्सचेंजनंतर, एक गोल्ड स्पॉट एक्सचेंजदेखील येणार आहे, ज्याचे नियामक सेबी असेल. गोल्ड स्पॉट एक्सचेंजद्वारे त्याची खरेदी केली जाईल. उर्वरित जगाच्या नजराही या एक्स्चेंजवर असतील.

    एका अंदाजानुसार, यावेळी भारतीय घरांमध्ये सुमारे 22,000 टन सोने पडून आहे, जे निष्क्रिय आहे. तज्ज्ञांच्या मते, भारत वर्षाला 800-900 टन सोन्याचा वापर करतो. इंटरनॅशनल बुलियन एक्स्चेंजमध्ये देशभरात सोन्याचे एकसमान मूल्य असणे अपेक्षित आहे. आज सोन्याचे दर राज्यानुसार बदलतात. असे सांगितले जाते की, अहमदाबादजवळ गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक (GIFT) शहर या एक्सचेंजसाठी निवडले गेले आहे.

    भारतात सोन्याचा जास्त वापर झाल्यामुळे सरकारने हे एक्सचेंज सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. IFSCA बुलियन एक्सचेंजचे नियामक म्हणूनदेखील काम करेल. 2019 मध्ये भारतात सुमारे 700 टन सोन्याचा वापर झाला. देशातील सर्व मोठ्या बँका, गोल्ड एक्सचेंज ट्रेड फंड (ETF), MMTC सारख्या सरकारी एजन्सीला बुलियन एक्सचेंजचे सदस्यत्व दिले जाईल.

    मोठ्या ज्वेलर्सना सब डीलरशिप दिली जाऊ शकते. रत्ने आणि दागिने निर्यातदार आणि सराफा तज्ज्ञांच्या मते, कोरोना महामारीमुळे सोन्याचे दर सतत बदलत होते. या काळात सोन्याला मागणी नव्हती. अमेरिका आणि इतर आंतरराष्ट्रीय सट्टेबाजांकडून सोन्याची खरेदी-विक्री करून किमती ठरवल्या जातात, ज्यांचा भारताशी काहीही संबंध नाही.

    What is the International Bullion Exchange, what gold rates will be fixed in India

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Amritpal : अमृतपालवरील NSA वर्षभरासाठी वाढवला; २३ एप्रिलपासून लागू होणार, हायकोर्टात अपिलाची तयारी

    Karnataka’s Janave : कर्नाटकातील जानवे वाद- महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कर्मचारी निलंबित; जानव्यामुळे विद्यार्थ्याला सीईटीच्या पेपरला बसण्यापासून रोखले

    Rahul Gandhi राहुल गांधींकडून सावरकरांचा पुन्हा अपमान, कथित माफीनाम्यावरून नवे दावे!!