• Download App
    पंतप्रधान मोदींच्या मन की बातचे वैशिष्ट्य काय?; जे. पी. नड्डांनी लक्षात आणून दिले 'रहस्य' What is the characteristic of PM Modi's Mann Ki Baat?

    पंतप्रधान मोदींच्या मन की बातचे वैशिष्ट्य काय?; जे. पी. नड्डांनी लक्षात आणून दिले ‘रहस्य’

    प्रतिनिधी

    कोट्टायम : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 ऑक्टोबर 2014 रोजी सुरू केलेला मन की बात रेडिओ संवादाचा 93 वा एपिसोड आज झाला. त्या दिवसापासून दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान मोदींनी अखंडपणे जनतेशी रेडिओ संवाद साधला आहे. पण या मन की बात रेडिओ संवादाचे नेमके वैशिष्ट्य काय आहे?? पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय जनतेशी असा कोणता संवाद साधतात, की ज्यामुळे जनता त्याकडे आकृष्ट होते??, याचे रहस्य काय??, ते आज केरळच्या कोट्टायम मध्ये उलगडले गेले आहे. What is the characteristic of PM Modi’s Mann Ki Baat?

    मोदींच्या मन की बात या रेडिओ संवादाचे रहस्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी उलगडून सांगितले आहे. नड्डा आज केरळच्या दौऱ्यावर आहेत. देशातील घातपाती कारवायांना आर्थिक बळ पुरवणारी, टेरर फंडिंग करणारी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया वर केरळमध्ये सर्वात मोठी कारवाई नुकतीच करण्यात आली. राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएने पीएफआयच्या 22 म्होरक्यांना केरळमधून अटक केली. पीएफआयने केरळमध्ये त्याविरुद्ध हिंसक आंदोलन केले. या पार्श्वभूमीवर जे. पी. नड्डा यांचा आजचा केरळ दौरा महत्त्वाचा आहे.

    पण या दौऱ्यात त्यांनी कोट्टायममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मन की बात हजारो कार्यकर्त्यांचा साक्षीने ऐकली आणि त्याचे “रहस्य” उलगडून सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बातचा आजचा 93 वा एपिसोड आपण ऐकला. यातून एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे आत्तापर्यंतच्या प्रत्येक एपिसोड मध्ये पंतप्रधानांनी विविध विषयांवर जनतेशी थेट संवाद साधला. पण एकदाही… अक्षरशः एकदाही कधीच राजकारणाचा उल्लेख केला नाही. हे त्याचे वैशिष्ट्य आहे, असे जे. पी. नड्डा म्हणाले.

    आणि खरोखरच पंतप्रधान मोदी हे मन की बात साठी राजकारण सोडून सर्वसामान्य जनतेच्या सामान्य जीवनाशी निगडित असलेले विषयच संवादासाठी निवडतात. किंबहुना आपण कोणत्या विषयावर मन की बात करावी हे विषय देखील ते तमाम भारतीय जनतेवर सोडून देतात. देशभरातील लाखो लोक त्यांना विविध विषयांवर सूचना करत असतात आणि त्यांची टीम त्यातल्या विशिष्ट सूचना स्वतः मोदींच्या सल्ल्याने निवडत असते. मोदी त्यावर भाष्य करताना दिसतात. यात राजकारण हा विषय कटाक्षाने टाळल्याचे दिसून येते. जे. पी. नड्डा यांनी हे वैशिष्ट्य लक्षात आणून दिले आहे.

    What is the characteristic of PM Modi’s Mann Ki Baat?

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट