• Download App
    भाजपची स्ट्रॅटेजी काय?; काय सांगतात आकडे? वाचा तपशीलवार What is BJP's strategy?; What do the numbers say?

    #BJPNEC2023 : भाजपची स्ट्रॅटेजी काय?; काय सांगतात आकडे? वाचा तपशीलवार

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : देशातील विरोधक एकीकडे 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान कोण होणार?, भाजपला कसे पराभूत करायचे? यासाठी भारत जोडो यात्रेसह परसेप्शनची लढाई लढत असताना भाजप स्वतःची स्ट्रॅटेजी वेगळ्या पद्धतीने आखताना दिसत आहे. भाजपच्या विस्तृत राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज राजधानीत सुरू झाली आहे. त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा रोड शो केला आहे आणि रोड शो करून ते राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत दाखल झाले आहेत. What is BJP’s strategy?; What do the numbers say?

    तत्पूर्वी सकाळी बैठकीच्या उद्घाटन भाषणात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी भाजपची स्ट्रॅटेजी सर्व राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यांपुढे उलगडून सांगितली. त्याची तपशीलवार नोंदणी सर्व सदस्यांनी केली. भाजपला केवळ काँग्रेसला पर्याय म्हणून पक्ष उभा करण्यापेक्षा देशभरात सर्व लोकसभा मतदारसंघ, सर्व विधानसभा मतदारसंघ इथपासून ते सर्व ग्रामपंचायतींपर्यंत किंबहुना सर्व ग्रामपंचायतींच्या वॉर्डांपर्यंत पोहोचायचे आहे, असे सांगितले. याचा अर्थ देशातला एकही कानाकोपरा भाजपच्या झेंड्याशिवाय सोडायचा नाही किंवा ऑप्शनला टाकायचा नाही ही भाजपची मूळ स्ट्रॅटेजी आहे, हे स्पष्ट दिसून येते.

    पण त्यातही स्ट्रॅटेजीचे बारकावे विशिष्ट आकडेवारी मध्ये प्रतिबिंबित झाले आहेत. नड्डा यांच्या भाषणाची माहिती देताना भाजपचे प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी या संदर्भात सविस्तर खुलासा केला आहे. 2023 मध्ये होणाऱ्या 9 राज्यांमधल्या निवडणुका भाजपच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेतच. त्या लोकसभा निवडणूक 2024 ची सेमीफायनल असू शकते. त्यामुळे सर्व 9 प्रदेशांमध्ये विजयासाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसून तयार राहिले पाहिजे, असे आवाहन नड्डा यांनी केल्याचे प्रवेश शंकर प्रसाद यांनी स्पष्ट केले.



    पण त्या पलिकडे जाऊन 100 लोकसभा मतदारसंघांची विशिष्ट स्ट्रॅटेजी पक्षाने ठरविल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. हे ते 100 लोकसभा मतदारसंघ आहेत, जिथे भाजप कमजोर होता. या कमजोर मतदारसंघांमध्ये 72 हजार बुथ चिन्हीत करून त्यावर बारकाईने काम करण्यात आले. या बूथ मधल्या मतदारांसंदर्भात पक्षाने विशेष कार्यक्रम घेऊन कॉन्सन्ट्रेट केले. पण त्या पलिकडे जाऊन 1 लाख 30 हजार बूथ वर भाजपच्या कार्यकर्त्यांनी काम केले आहे. केंद्रातील मोदी सरकारने राबविलेल्या प्रत्येक योजनेची माहिती आणि लाभ या 1 लाख 30 हजार बूथ वरील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम भाजपच्या कार्यकर्त्यांनी केले आहे. त्यांच्या समस्या जाणून घेण्यापासून ते त्यांना योजनांचे लाभ देण्यापर्यंत कार्यकर्त्यांनी फॉलोअप घेतला आहे. त्यामुळे ज्या 100 लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजप कमजोर आहे तिथे ती परिस्थिती जमिनी स्तरावर बदलण्याचे काम वेगात सुरू आहे, याकडे रविशंकर प्रसाद यांनी लक्ष वेधले आहे.

    भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचा आज पहिला दिवस होता. उद्या कार्यकारिणीची बैठक पुढे चालू राहणार असून त्यामध्ये विविध राजकीय, सामाजिक, आर्थिक प्रस्ताव यांच्यावर विचार मंथन करून ते संमत केले जाणार आहेत. त्याच वेळी 9 राज्यांमधील विधानसभा मतदारसंघ क्षेत्र तसेच लोकसभा मतदारसंघ क्षेत्र यावर बारकाईने विचार विनिमय करून पुढची स्ट्रॅटेजी ठरविण्यात येणार आहे.

    काँग्रेसची भारत जोडो यात्रा अंतिम टप्प्यात आहे. त्यानंतर काँग्रेसचे हाथ से हाथ जोडो अभियान सुरू होणार आहे. त्याच वेळी काँग्रेस विरोधकांचे ऐक्य घडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पण हे सर्व प्रयत्न परसेप्शन लेव्हललाच असण्याची चिन्हे आहेत. अशा स्थितीत भाजपने कमजोर असलेल्या 100 लोकसभा मतदारसंघांवर कॉन्सन्ट्रेट करणे त्यातल्या 72 हजार बूथ वर काम करणे आणि त्यापलिकडे जाऊन 1 लाख 30 हजार बूथ पर्यंत पोहोचणे याला स्ट्रॅटेजिक दृष्ट्या वेगळे महत्त्व आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये याचा प्रत्यक्ष परिणाम दिसणार आहे.

     आकडे बोलतात

    •  2023 : 9 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका. प्रत्येक राज्यावर भाजपचे कॉन्सन्ट्रेशन
    •  देशभरात 100 लोकसभा मतदारसंघांत भाजप कमजोर
    •  72000 हजार बूथ चिह्नित. तिथे प्रत्यक्ष कार्यकर्त्यांचे काम
    •  1,30000 बूथपर्यंत भाजपचे कार्यकर्ते पोहोचले.
    •  केंद्र सरकारच्या योजनांच्या लाभार्थी संख्येत वाढ करण्याचे टार्गेटेड उद्दिष्ट

    What is BJP’s strategy?; What do the numbers say?

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!