नाशिक : Epstein files उघडण्याच्या निमित्ताने 19 डिसेंबर 2025 रोजी भारताचा राजकारणात असा काही भूकंप होईल की, ज्यामुळे मराठी माणसाला पंतप्रधान पदाची संधी मिळेल, असे राजकीय भाकीत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी करून मोठी राळ उडवून दिली. पण त्यांनी एकदा भाकीत करून ते सोडून दिले असते, तर त्याकडे उथळ भाकीत म्हणून किंवा राजकीय पुडी पाहिले गेले असते. सुरवातीला ते तसेच होते. परंतु पृथ्वीराज चव्हाण नंतर वारंवार तेच आणि तसेच बोलत राहिले. ते जास्तीत जास्त गांभीर्याने बोलत राहिले. त्यातून त्यांच्या राजकीय भाकिताची बातमी केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता ती देशव्यापी झाली. तिच्यावर हिंदी आणि इंग्रजी माध्यमांनी सुद्धा चर्चा सुरू केली.
याच दरम्यान Epstein files मध्ये फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव नाही, तर पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी आणि तीन-चार माजी खासदारांची नावे आहेत, अशी माहिती सुद्धा बाहेर आली. अर्थातच या माहितीची अधिकृत पुष्टी कुणी केली नाही, पण पृथ्वीराज चव्हाण यांनी किमान तीन – चार वेळा मराठी पंतप्रधान बनणार असल्याचे भाकीत करून महाराष्ट्रात देशातल्या राजकीय वातावरणात बदल होतील, असे संकेत दिले. त्या संकेतांपासून ते अजिबात मागे हटले नाहीत. तेच ते बोलत राहिले
पृथ्वीराज चव्हाण हे तसे प्रकृतीने गंभीर राजकीय नेते आहेत. रोज पत्रकार परिषदा घेऊन हवेत राजकीय पुड्या सोडणारे ते नेते नाहीत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर येण्यापूर्वी त्यांनी मनमोहन सिंग यांच्या काळात पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्रीपद सांभाळले होते. त्यामुळे पंतप्रधान कार्यालयात नेमके काय चालते आणि कसे चालते, याची पृथ्वीराज चव्हाण यांना इत्थंभूत माहिती आहे. दिल्लीच्या political power corridor मध्ये त्यांचा नेहमीच वावर राहिला होता. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर आल्यानंतर पृथ्वीराज बाबांनी मोदींच्या “लाडक्या” गुरूंना म्हणजे शरद पवारांना सुद्धा जेरीस आणले होते, हे विसरून चालणार नाही. पण तरीदेखील किंबहुना पृथ्वीराज चव्हाण हे दिल्लीचे political material आहेत. ते महाराष्ट्रातले प्रादेशिक political material नाहीत, असे देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य करून पृथ्वीराज चव्हाण यांच्या political character बद्दल अचूक निदान केले होते.
– पृथ्वीराज बाबांचा इरादा काय??
गंभीर राजकीय प्रकृतीच्या पृथ्वीराज चव्हाण यांनी जेव्हा वारंवार तेच ते भाकीत केले आणि त्या भाकितापासून ते मागे हटले नाहीत, याचा अर्थ ते तसे घडले असे नाही, पण पृथ्वीराज चव्हाण यांच्या ते वक्तव्य करण्यामागचा नेमका इरादा काय आहे??, हे मात्र तपासावे लागेल.
वर उल्लेख केल्याप्रमाणे पृथ्वीराज चव्हाण हे काही महाराष्ट्रातले प्रादेशिक राजकारणातले नेते नव्हेत. ते दिल्लीतले राष्ट्रीय पातळीवरचे नेते आहेत. परंतु, काँग्रेस मधल्या सध्याच्या केंद्रीय नेतृत्वाच्या फळीत निदान त्यांचा सध्यातरी समावेश नाही. महाराष्ट्रात त्यांना काँग्रेसमध्ये तसे कुठले काम उरलेले नाही. कराड विधानसभा मतदारसंघातून पराभूत झाल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस मधून सुद्धा बाजूला पडले गेले. अशा स्थितीत political comeback करायचे असेल आणि पुन्हा आपली अगदी मूळ स्थिती नाही, तरी केंद्रीय राजकारणातली काही विशिष्ट स्थिती निर्माण करायची असेल, तर आपण राजकीय बातमीच्या चर्चेत राहिले पाहिजे, हा पृथ्वीराज चव्हाण यांचा होरा असेल, तर तो चूक मानता येणार नाही.
– Political comeback
मग राजकीय बातमीच्या चर्चेत राहायचे, तर कुठल्यातरी Vote Chori vote सारख्या काल्पनिक गोष्टींवर भर देण्यापेक्षा अतिशय गांभीर्यपूर्वक थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अडकवणारी गोष्ट राजकीय हवेत सोडली, तर काय बिघडले??, असा विचार पृथ्वीराज चव्हाण यांनी केला असेल, तर तोही बाजूला टाकता येणार नाही. पृथ्वीराज चव्हाण यांनी हे भाकीत वर्तविताना थेट मोदींवर कुठलाही हल्लाबोल केला नाही. त्यांनी मराठी पंतप्रधान होईल, असे भाकीत केले. यातून पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्र पातळीपेक्षा देश पातळीवरच्या बातम्यांमध्ये स्थान मिळविले. आपल्या भाकितावर कायम राहून किंबहुना कोलांटी उडी न मारून आपली गंभीर राजकीय नेत्याची प्रतिमा बिघडू दिली नाही. एक प्रकारे पृथ्वीराज चव्हाण यांचा दिल्लीच्या राष्ट्रीय राजकारणात political comeback करण्याचा निदान पहिला प्रयत्न तरी या निमित्ताने काही अंशी यशस्वी ठरला हे मान्य करावे लागेल.
What exactly is Prithviraj Baba’s motive behind predicting political futures
महत्वाच्या बातम्या
- महायुतीत अजितदादा एकाकी; राष्ट्रवादीचा होणार political size कमी!!
- पुण्यात आणि पिंपरी चिंचवड मध्ये भाजपची अजितदादांच्या राष्ट्रवादीशी नाही युती; देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती
- Goa Nightclub : गोवा अग्निकांड- जेवण करायला बाहेर पडले आणि लूथरा बंधूंना पकडले; थायलंडमध्ये हद्दपारीची प्रक्रिया सुरू
- Syria : सीरियामध्ये अमेरिकन सैनिकांवर ISIS चा हल्ला; 3 ठार, ट्रम्प म्हणाले- सडेतोड उत्तर देईन