विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रिप्टोकरन्सीच्या धोक्याची सिडनी डायलॉग मध्ये जाणीव करून दिली आहे. क्रिप्टोकरन्सी चुकीच्या हातात जाऊन युवकांचे जीवन बरबाद होऊ नये, असा गंभीर इशारा त्यांनी दिला आहे. पण काय आहे ही क्रिप्टोकरन्सी…?? तिच्यापासून जगाला कोणता धोका आहे??, हे जाणून घ्यायचा प्रयत्न केल्यावर त्यातले बारकावे लक्षात येतात.What exactly is cryptocurrency?
- क्रिप्टोकरन्सी म्हणजे आभासी चलन तिच्यावर कोणत्याही देशाच्या बँकेचे निर्बंध आणि नियंत्रण नाही असे चलन.
- रिझर्व बँकेने 2018 मध्ये बिटकॉइन सारख्या क्रिप्टोकरन्सीवर बंदी आणली होती. परंतु न्यायालयीन लढाईत
सर्वोच्च न्यायालयाने क्रिप्टोकरन्सीच्या ट्रेडिंगवरील बंदी 2020 मध्ये उठविली. - सर्वोच्च न्यायालयाने आभासी चलनाच्या (क्रिप्टोकरन्सी) वापरावर लावण्यात आलेली बंदी उठवली असून व्यवहारात वापर करण्यासाठी परवानगी दिली आहे.
- आभासी चलन ही संकल्पना आता जवळपास दशकभर जुनी झाली आहे. त्यामुळे आभासी चलन म्हणजे काय, हे बहुतेकांना माहीत असेलच. आभासी चलन अर्थात ‘क्रिप्टोकरन्सी’ हे संगणकीय अल्गोरिदमच्या आधारे निर्माण करण्यात आलेले चलन आहे. या चलनाला भौतिक रूप नसते. मात्र, तुम्ही आर्थिक देवाणघेवाणीसाठी ते वापरू शकता.
- २००९ मध्ये सातोशी नाकामोतो नावाच्या एका अभियंत्याने बिटकॉइनची संकल्पना अस्तित्वात आणली.
- एका संगणकीय प्रोग्रॅममधील गणितीय आकडेमोड करून बिटकॉइन अस्तित्वास आले. त्यानंतर गेल्या दशकभरात शेकडो प्रकारच्या क्रिप्टोकरन्सी संगणकीय प्रणाली जगात निर्माण झाल्या.
- अशा प्रकारच्या आभासी चलनाद्वारे केलेले आर्थिक व्यवहार अतिशय गोपनीय असतात. या चलनाच्या व्यवहारांसाठी कोणत्या बँकेशी संलग्न राहण्याची आवश्यकता नाही.
- या आभासी चलनावर कोणा एका कंपनीची वा देशाची मक्तेदारी तसेच नियंत्रण नाही. कोणत्याही देशाच्या सीमेचे बंधन नसल्याने आणि कोणत्याही स्वरूपाचा कर त्यांना लागू होत नसल्याने गेल्या दशकभरात आभासी चलनाचा वापर वाढला आहे. त्यामुळे गेल्या दशकभरात या आभासी चलनांची उलाढाल अब्जावधी डॉलर आहे.
- अनेक देशांतील बँका, हॉटेल, कंपन्या, संकेतस्थळे यांनी आभासी चलनाचा स्वीकार केला आहे. त्यामुळे या चलनाचे मूल्यही दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यातूनच या आभासी चलनांचे विनिमय बाजार उभे राहिले. या बाजारांत जगभरातील आभासी चलनांचे भौतिक चलनांच्या तुलनेतील मूल्य दररोज ठरते.
- आभासी चलनाला अजूनही अनेक देशांत मान्यता मिळालेली नाही. आजही ते कायद्याच्या चौकटीत बसत नाही. तरीही या आभासी चलनांची उलाढाल अब्जावधी डॉलरच्या घरात आहे.
- क्रिप्टोकरन्सी जगभरातल्या ड्रग्ज तस्करी मध्ये घुसली. शस्त्रास्त्र तस्करीमध्ये तिचा वापर वाढला यातून जगाला ड्रग्जचा आणि शस्त्रास्त्रांचा विळखा पडला आहे. युवकांचा ड्रग्जकडे वाढता कल हा खरे म्हणजे क्रिप्टोकरन्सीचा परिणाम आहे. कारण प्रत्यक्ष हातात पैसे नसताना ते वापरणे शक्य होते. आणि तंत्रज्ञानाचा अनिर्बंध वापर युवक करू शकतात त्यातून क्रिप्टोकरन्सीच्या वापररातून ड्रग्जचा अनिर्बंध जाळ्यात भारतातलेच नव्हे, तर जगभरातले युवक अडकले आहेत. भारतासाठी तो धोका अधिक वाढतो आहे कारण भारताची लोकसंख्या सध्या 15 ते 35 वयोगटातील सर्वाधिक आहे आणि इथेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रिप्टोकरन्सीच्या धोक्याकडे वेधलेले लक्ष अत्यंत महत्त्वाचे आहे..
What exactly is cryptocurrency?
महत्त्वाच्या बातम्या
- पुणे-दुबई विमानसेवा सुरू; दीड वर्षांनी पुण्यातून आंतरराष्ट्रीय विमानाचे उड्डाणे सुरु झाल्याने दिलासा
- एसटी संप : बुलडाण्यातील विष प्राशन केलेल्या एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू , एसटी कर्मचारी आत्महत्त्या संख्येत पडली भर
- Sydney Dialogue : क्रिप्टोकरन्सीवर पहिल्यांदाच बोलले मोदी, म्हणाले – क्रिप्टो चुकीच्या हातात जाऊ नये, अन्यथा तरुणाई उद्ध्वस्त होईल!
- वडेट्टीवारांपाठोपाठ खासदार कृपाल तुमानेंची जीभ घसरली; म्हणाले, कंगनाला काय काय चाटून पद्मश्री मिळालीये, हे सर्वांना माहितीय!!