• Download App
    संजय राऊत अर्ज भरतानाचा "हा" फोटो नेमके काय सांगतो?? What exactly does "this" photo of Sanjay Raut filling out the application say?

    राज्यसभा निवडणूक : संजय राऊत अर्ज भरतानाचा “हा” फोटो नेमके काय सांगतो??

    शिवसेनेचे राज्यसभेचे उमेदवार संजय राऊत अर्ज भरतानाचा “हा” फोटो आहे!! “हा” फोटो नेमके काय सांगतो आहे?? “हा” फोटो महाराष्ट्रातल्या आजच्या म्हणजे 26 मे 2022 च्या राजकीय स्थितीवर भाष्य करतोय का?? याचा “उघडून डोळे, पाहून नीट” अभ्यास केला तर त्याचे उत्तर “होय” असेच येते!!
    What exactly does “this” photo of Sanjay Raut filling out the application say?

    स्वतः अर्जकर्ते म्हणून संजय राऊत हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मध्ये बसले आहेत. त्यातही संजय राऊत यांच्या उजवीकडे शरद पवार आणि डावीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बसलेले दिसत आहेत!!

    …पण मागे उभे राहिलेले काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड हेच नेमके राजकीय भाष्य करून जातात!! संपूर्ण हॉल मध्ये काँग्रेसचे वरिष्ठ मंत्री बाळासाहेब थोरात यांना बसायला खुर्ची नाही. संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत या कोचवर बसल्या आहेत. मागे दरवाज्याजवळ विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे उभ्या आहेत, पण काँग्रेसचे वरिष्ठ मंत्री बाळासाहेब थोरात यांना बसायला विधिमंडळाच्या निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात खुर्ची नाही… हे “चित्र” काय सांगून जाते??


    Sanjay Raut : “पवारांच्या माणसाच्या” स्वागताला फक्त शिवसैनिकच; नाही राष्ट्रवादीचा एकही नेता अथवा कार्यकर्ता!!


    महाराष्ट्रात काँग्रेसची राजकीय स्थिती शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जाताना “अशीच” झाली आहे का?? महाराष्ट्रात काँग्रेस अस्तित्वात तर आहे, पण राष्ट्रवादी आणि शिवसेना यांना बसायला सत्तेची खुर्ची आहे आणि काँग्रेस मात्र पाठीमागे उभी आहे असेच यातून दिसून येते ना??

    काँग्रेसची आजची राजकीय अवस्था महाराष्ट्रातला विधानसभेच्या संख्याबळाच्या दृष्टीने चौथ्या क्रमांकाचा पक्ष अशी आहे. पहिला क्रमांकाचा पक्ष सत्तेच्या बाहेर अर्थात विरोधी पक्षात आहे. दुसऱ्या क्रमांकाच्या पक्षाचा मुख्यमंत्री आहे. तिसऱ्या क्रमांकाच्या पक्षप्रमुखांना बसायला खुर्ची आहे आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या पक्षाच्या नेत्यांना उभे राहण्याची जागा आहे!! हेच “राजकीय चित्र” या फोटोतून दिसत नाही का??

     बाळासाहेब काय म्हणाले होते??

    1000 शब्दांच्या अग्रलेखापेक्षा पेक्षा एक छायाचित्र किंवा एक व्यंगचित्र बरेच काही बोलून जाते, व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे म्हणत असत. त्यांच्या कुंचल्याचे फटकारे अनेकांनी खाल्ले होते. आज बाळासाहेब आपल्यात नाहीत. पण त्यांनी सांगितलेली चित्रांची आणि छायाचित्रांची महती आपल्याला माहिती झाली आहे!!

    – हे “बोलके छायाचित्र” शिवसेनेच्या फेसबुक अकाउंट वरून शेअर केले आहे. याला देखील निश्चित राजकीय महत्त्व आहे. या जगात “काय” बोलतो?, या पेक्षा “कोण” बोलतो?, याला अधिक महत्त्व आहे, असे पु. ल. म्हणाले होते.

    – या न्यायाने संजय राऊत अर्ज भरतानाच्या या फोटोने महाराष्ट्राचे आजचे राजकीय चित्र ठळकपणे उलगडून दाखवले आहे!!, इतकेच!!

    What exactly does “this” photo of Sanjay Raut filling out the application say?

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!