वृत्तसंस्था
पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे सध्या विरोधी ऐकण्यासाठी सर्व नेत्यांना भेटून प्रयत्न करत असताना त्यांच्या या प्रयत्नांची मागच्या इतिहासाचा हवाला देत निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी खिल्ली उडवली आहे. त्यासाठी त्यांनी 2019 चे चंद्राबाबू नायडू यांचे उदाहरण दिले आहे. What Chandrababu did in 2019, Nitish Kumar is doing now
2019 मध्ये चंद्राबाबू नायडूंनी अशाच प्रकारे सर्व विरोधी नेत्यांना भेटून एकजूट करायचा प्रयत्न केला होता. पण ती एकजूट तर झाली नाहीच, उलट चंद्राबाबू नायडू आंध्र प्रदेशातून सत्तेबाहेर गेले. तेव्हा चंद्रबाबू नायडू होते. आता नितीश कुमार आहेत, अशा शब्दांमध्ये प्रशांत किशोर यांनी नितीश कुमार यांची खिल्ली उडवली आहे.
चंद्राबाबू नायडू हे निदान त्यावेळी आंध्र प्रदेशात पूर्ण बहुमतात तरी होते. पण 2019 मध्ये विरोधकांचे ऐक्य साधताना त्यांचे आंध्रप्रदेश कडे पूर्ण दुर्लक्ष झाले. नंतर तिथे झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाचे फक्त 23 आमदार निवडून आले. आता नितीश कुमार यांची बिहारमध्ये स्वतःची बहुमताची सत्ता नाही. ते लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाच्या टेकूवर सरकारमध्ये उभे आहेत.
बिहारमध्ये त्यांचा स्वतःचा ठिकाणा नाही आणि ते देशभर फिरून विरोधी पक्षांचे ऐक्य घडवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचे परिणाम चंद्राबाबूंना 2019 मध्ये आंध्रात भोगावे लागले. 2024 मध्ये नितीश कुमार यांचे काय होईल?, हे आपण सांगायची गरज नाही. त्याचा परिणाम दिसेल, अशा शब्दांमध्ये प्रशांत किशोर यांनी खिल्ली उडवली आहे.
What Chandrababu did in 2019, Nitish Kumar is doing now
महत्वाच्या बातम्या
- पाकिस्तानी मुस्लीमही करत आहेत पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाची प्रशंसा, मेलबर्नमध्ये ‘’मोदी है तो मुमकिन है’’ नारा!
- Karnataka Election : ”धर्माच्या आधारे आरक्षण असंवैधानिक” अमित शाहांनी कर्नाटकात दिले मोठे संकेत
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे 28 एप्रिलला मॉरिशसमध्ये फडणवीसांच्या उपस्थितीत लोकार्पण
- नितीश कुमार यांनी विरोधकांमध्ये खुली केली पंतप्रधान पदाची स्पर्धा; म्हणाले, आधी एकजूट करू, मग नेता निवडू!!