विशेष प्रतिनिधी
मुंबई – ‘हंग्री फॉर कार्गो’ या मोहिमेअंतर्गत पश्चिम रेल्वे प्रशासनाद्वारे देशभरात वेगाने पार्सल वाहतूक सुरू आहे. त्यामुळेच एप्रिल ते डिसेंबर २०२१ या कालावधीत पश्चिम रेल्वेने ५८७ पार्सल विशेष गाड्या चालवून २०० कोटी रुपयांचा महसूल जमा केला आहे.Western Railway Earn 200 cr from cargo trains
१ एप्रिल ते २२ डिसेंबरपर्यंतच्या कालावधीत नियोजित वेळापत्रकानुसार ५८७ पार्सल विशेष गाड्या चालविण्यात आल्या. यातून एकूण २.२८ लाख टनांहून अधिक सामग्रीची वाहतूक केली. यामध्ये शेती उत्पादन, औषधे, मासे, दूध, ऑपरेशनाची उपकरणांचा समावेश होता. यातून पश्चिम रेल्वेच्या तिजोरीत एकूण २०१.०९ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला. मागील वर्षी याच कालावधीत ११५.५६ कोटी रुपयांची कमाई केली होती.
पश्चिम रेल्वेने या कालावधीत ९३ हजार ५०० टनांहून अधिक भार आणि वॅगनच्या साह्याने १३३ दूध विशेष ट्रेन चालविण्यात आल्या. १४८ कोविड-१९ विशेष पार्सल ट्रेन चालविण्यात आल्या. २९ हजार ३०० टन अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करण्यात आली. यासह १६९ इंडेंटेड रेकद्वारे ६८ हजार ६०० टन वस्तूंची वाहतूक करण्यात आली. किसान रेल्वेच्या १३७ गाड्या चालवून ३७ हजार टन वजनी सामग्रीची वाहतूक केली.
Western Railway Earn 200 cr from cargo trains
महत्त्वाच्या बातम्या
- अॅमेझॉन, फ्लिपकार्टच्या परवानग्या मागे घेण्याची स्वदेशी जागरण मंचाची सरकारकडे मागणी
- मुंबईत ओमिक्रॉनचा धसका, कोविड केंद्रातील तब्बल ३५ हजार खाटा पुन्हा सुरू करणार
- ओमिक्रॉनचा युरोपला सर्वाधिक फटका, अमेरिकेत बूस्टर डोसवर भर
- चीनला शह देण्यासाठी तैवानकडून सीमेवर एफ-१६ विमाने तैनात
- ओमायक्रॉनला कोरोनावरील नैसर्गिक लस म्हणणे धोकादायक, बेजबाबदारपणे याची चर्चा करणे चुकीचे असल्याचे तज्ज्ञांचे मत