• Download App
    पश्चिम बंगालमध्ये सहाव्या टप्प्यातील मतदानासाठी मतदारांमध्ये उत्साह ; मतदारांच्या लांबच लांब रांगा। WestBengal Polls commence at 7 am today

    पश्चिम बंगालमध्ये सहाव्या टप्प्यातील मतदानासाठी मतदारांमध्ये उत्साह ; मतदारांच्या लांबच लांब रांगा

    वृत्तसंस्था

    कोलकाता : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकींच्या सहाव्या टप्प्यातील मतदानास आज सुरुवात झाली. ४३ मतदारसंघांसाठी होणाऱ्या मतदानात ३०६ उमेदवारांचं भवितव्य सील होत आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदान सुरु झाले असून मतदान केंद्रांबाहेर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. WestBengal Polls commence at 7 am today

    केंद्रीय सुरक्षा दलाचे हजार ७१ जवान तैनात केले आहेत. मदतानामध्ये उत्तर २४ परगना जिल्ह्यातील १७ जागांबरोबरच नादिया आणि उत्तर दिनाजपुरमधील प्रत्येकी नऊ जागांसाठी मतदान होणार आहे. पूर्व बर्ध्दमानमधील आठ जागांसाठी मतदान होत आहे.



    भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय, तृणमूलचे मंत्री ज्योतिप्रिय मल्लिक आणि चंद्रिमा भट्टाचार्य तसेच माकपा नेते तन्मय भट्टाचार्य यांचं भविष्य मतदान यंत्रात सील होत आहे. त्याचबरोबर चित्रपट निर्देशक राज चक्रवर्ती, अभिनेत्री कौसानी मुखर्जी या तृणमूलच्या मैदानात आहेत. चार जिल्ह्यांमधील ४३ विधानसभा क्षेत्रांमध्ये १४ हजार ४८० मतदान केंद्र असून भाजपा विरुद्ध तृणमूल अशी लढत आहे.

    WestBengal Polls commence at 7 am today

    Related posts

    India-Pakistan War :अमेरिकन थिंक टँकचा दावा- 2026 मध्ये भारत-पाक युद्धाची शक्यता; दोन्ही देशांनी शस्त्रांची खरेदी वाढवली

    World’s 4th Largest Economy : भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकले; 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकणार

    Raihan Vadra Engagement : प्रियंका गांधी यांचा मुलगा रेहानचा मैत्रीण अवीवा बेगसोबत साखरपुडा; दोघांनाही फोटोग्राफी-फुटबॉलची आवड