Monday, 12 May 2025
  • Download App
    पश्चिम बंगालचा मतदानाचा सहावा टप्पा कमालीच्या शांततेत संपन्न, सुमारे ७० टक्के मतदान|West Bengal's sixth phase of polling was extremely peaceful, with about 70 per cent turnout

    पश्चिम बंगालचा मतदानाचा सहावा टप्पा कमालीच्या शांततेत संपन्न, सुमारे ७० टक्के मतदान

    विशेष प्रतिनिधी

    कोलकता : पश्चिचम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात गुरुवारी सुमारे ७०.०९ टक्के मतदान झाले. या टप्प्यात भाजपचे मुकुल रॉय, तृणमूल काँग्रेसच्या मंत्री ज्योतिप्रियो मलिक, चंद्रिमा भट्टाचार्य, काँग्रेसचे अब्दुस सत्तार, ‘माकप’चे तन्मय भट्टाचार्य आदींसह एक हजारहून अधिक जणांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले.West Bengal’s sixth phase of polling was extremely peaceful, with about 70 per cent turnout

    गेल्या वेळच्या हिंसाचाराचा अनुभव पाहता यावेळचे मतदान तुलनेने शांततेत झाले.आज तुफान कडेकोट बंदोबस्त होता. हेलिकॉप्टरनेही गस्त घालण्यात आली. तसेच सुरक्षा निरक्षणासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला. राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली असूनही मतदारांमध्ये उत्साह होता.



    उत्तर दिनजापूर जिल्ह्यासह अनेक ठिकाणच्या मतदान केंद्रांवर सकाळपासून मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. मतदानाच्यावेळी कोरोनाच्या नियमांचे पालन झाले.उत्तर दिनजापूर, नदिया, उत्तर २४ परगणा आणि वर्धमान जिल्ह्या तील एकूण ४३ जागांसाठी आज मतदान झाले.

    यात उत्तर दिनजापूरमधील लोकसभेच्या तीन मतदारसंघात भाजपचे खासदार आहेत. नऊ विधानसभा मतदारसंघांपैकी सहा ठिकाणी तृणमूल काँग्रेसचे आमदार आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, फॉरवर्ड ब्लॉक आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक आमदार आहे.

    West Bengal’s sixth phase of polling was extremely peaceful, with about 70 per cent turnout

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट