• Download App
    पश्चिम बंगाल हिंसाचार : केंद्राने ममता सरकारकडून मागवला अहवाल, 10 जणांच्या मृत्यूनंतर भाजप नेत्यांनी गृहमंत्र्यांची घेतली भेट West Bengal violence: Center calls for report from Mamata government, BJP leaders meet Home Minister after 10 deaths

    पश्चिम बंगाल हिंसाचार : केंद्राने ममता सरकारकडून मागवला अहवाल, 10 जणांच्या मृत्यूनंतर भाजप नेत्यांनी गृहमंत्र्यांची घेतली भेट

     

    पश्चिम बंगालमधील तृणमूल नेत्याच्या हत्येनंतर बीरभूमच्या रामपुरहाट परिसरातील बोगतुई गावात हिंसाचार उसळला आहे. येथे समाजकंटकांनी डझनभर घरांना आग लावली. ज्यामध्ये 10 जणांचा जळून मृत्यू झाला आहे. तर 38 जण जखमी झाले आहेत. हिंसाचारानंतर आता केंद्राने याप्रकरणी राज्य सरकारकडून अहवाल मागवला आहे. या आगीत सुमारे 40 घरे जळून खाक झाली आहेत.West Bengal violence: Center calls for report from Mamata government, BJP leaders meet Home Minister after 10 deaths


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील तृणमूल नेत्याच्या हत्येनंतर बीरभूमच्या रामपुरहाट परिसरातील बोगतुई गावात हिंसाचार उसळला आहे. येथे समाजकंटकांनी डझनभर घरांना आग लावली. ज्यामध्ये 10 जणांचा जळून मृत्यू झाला आहे. तर 38 जण जखमी झाले आहेत. हिंसाचारानंतर आता केंद्राने याप्रकरणी राज्य सरकारकडून अहवाल मागवला आहे. या आगीत सुमारे 40 घरे जळून खाक झाली आहेत.

    या हिंसाचारानंतर भाजप नेत्यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. बैठकीनंतर पश्चिम बंगालचे भाजप नेते सुकांता मजुमदार म्हणाले, “केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे की ते 72 तासांत बीरभूम घटनेचा अहवाल मागवतील, त्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी एक टीम तयार केली जाईल. ममता बॅनर्जी यांना जबाबदार धरले पाहिजे, त्या मुख्यमंत्री आहेत. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा.”

    कट रचल्याचा तृणमूलचा आरोप

    त्याचवेळी टीएमसीने या हिंसाचाराला षडयंत्र म्हटले आहे. टीएमसीचे राज्य सरचिटणीस कुणाल घोष म्हणाले, “रामपुरहाट गावात राजकीय तणावाचा इतिहास नाही. टीएमसी आणि बंगालला त्रास देण्याचा हा मोठा कट असल्याचा आम्हाला संशय आहे. ज्यांना लोकांनी नाकारले ते डेडबॉडी पॉलिटिक्स करत आहेत. त्यांनी आमच्या नेत्याची हत्या करून तणाव निर्माण केला.”

    ममतांनी पाठवले शिष्टमंडळ

    सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंसाचारानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंत्री फिरहाद हकीम यांच्या नेतृत्वाखाली तीन सदस्यीय शिष्टमंडळ रामपुरहाट हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी घटनास्थळी पाठवले आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून मिळालेल्या सूचनेच्या आधारे सीआयडीचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. यासोबतच राज्य सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय एसआयटी टीम स्थापन केली आहे.

    बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीची मागणी

    हिंसाचारानंतर भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांनी ममता सरकारवर निशाणा साधत राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, “पश्चिम बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिकट आहे. राज्याच्या विविध भागांत गेल्या आठवडाभरात 26 खुनाच्या घटना घडल्या आहेत. बंगालमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्राने हस्तक्षेप करून कलम 356 (राष्ट्रपती राजवट) किंवा 355 चा वापर करावा.”

    West Bengal violence: Center calls for report from Mamata government, BJP leaders meet Home Minister after 10 deaths

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!