विशेष प्रतिनिधी
कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात गुरुवारी 43 जागांवर मतदान होत आहे. यात एक कोटीहून अधिक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. या टप्प्यात भाजपचे मुकुल रॉय, टीएमसी मंत्री ज्योतिप्रियो मलिक आणि चंद्रिमा भट्टाचार्य या प्रमुख नेत्यांचे भवितव्य निश्चित होईल.दरम्यान आजचे चित्र पाहता महिला मतदार उत्साहाने मतदानाचा हक्क बजावत आहेत. हे एक प्रकारचे परिवर्तन म्हणता येईल.
पश्चिम बंगालमध्ये सकाळी 11 वाजेपर्यंत 43 जागांसाठी 37.27 टक्के मतदान झाले आहे. उत्तर दिनाजपूरमध्ये 40.97 टक्के, नादिया मध्ये 38.11 टक्के, उत्तर 24 परगणा 32.88 टक्के आणि पूर्व वर्धमानमध्ये 41.04 टक्के मतदान झाले आहे.
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात जोरदार मतदान सुरू आहे. अशा परिस्थितीत ड्रोनद्वारे या भागावर लक्ष ठेवले जात आहे.
सैनिकांनी मतदारावर उपचार केले :
नंदीग्राम गावात बुथजवळ एक मतदार जखमी झाला. यादरम्यान आयटीबीपी जवानांनी त्यावर प्राथमिक उपचार केले.
बानपारातील दृष्य
भाजपच्या उमेदवाराचे मतदान :
रायगंज विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कृष्णा कल्याणी यांनी बूथ क्रमांक 134 वर मतदान केले. ते म्हणाले की, येथे मतदान सुरू होण्यास थोडा उशिर झाला.
मुकुल रॉय यांनीही मतदान केले :
भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय यांनीही मतदान केले. त्यांनी उत्तर 24 परगनातील कंचरापारा येथील बूथ क्रमांक 141 वर मतदान केले.
मतदानामध्ये उत्साह :
कोरोनाच्या दुसर्या लाटेचा उद्रेक होऊनही बंगालमध्ये मतदानाबद्दल लोकांमध्ये उत्साह आहे. उत्तर दिनाजपूर जिल्ह्यात बूथ -17 वर मतदारांच्या लांबच लांब रांगा .