• Download App
    पश्चिम बंगाल पंचायत निवडणुकीतील हिंसाचारात १५ जणांचा मृत्यू झाल्याचा दावा; अमित शाहांनी मागवला अहवाल West Bengal panchayat election violence claims 15 dead Report asked by Amit Shah

    पश्चिम बंगाल पंचायत निवडणुकीतील हिंसाचारात १५ जणांचा मृत्यू झाल्याचा दावा; अमित शाहांनी मागवला अहवाल

    पंचायत निवडणुकीची घोषणा झाल्यापासून ३३ हून अधिक लोक मारले गेल्याचा भाजपा खासदाराचा आरोप

    विशेष प्रतिनिधी

    कोलकाता : पश्चिम बंगालमधील पंचायत निवडणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचाराची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दखल घेतली आहे. त्यांनी बंगाल भाजपाचे अध्यक्ष सुकांत मजुमदार यांच्याकडून हिंसाचाराचा तपशील मागवला आहे. West Bengal panchayat election violence claims 15 dead Report asked by Amit Shah

    पश्चिम बंगालमधील पंचायत निवडणुका रक्तरंजित झाल्या आहेत. मतदानादरम्यान खूप रक्त सांडले आहे. पहाटे बॉम्बस्फोट झाले आहेत, बंदुका आणि पिस्तुलांचा वापर केला गेला आहे, काही ठिकाणी तोडफोड झाली आहे, काही ठिकाणी बूथ ताब्यात घेण्यात आले आहेत, मतपेट्या तलावात बुडवल्या आहेत आणि काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात जाळपोळ झाली आहे. बंगालच्या बहुतांश भागात हिंसाचाराने थैमान घातले आहे.

    याशिवाय सकाळपासून सुरू असलेल्या मतदानादरम्यान १५ हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कारवाईच्या दृष्टीने अहवाल मागवला आहे.

    West Bengal panchayat election violence claims 15 dead Report asked by Amit Shah

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

     Indian Citizenship : दरवर्षी 2 लाख लोक परदेशात स्थायिक होत आहेत; 5 वर्षांत 9 लाख भारतीयांनी नागरिकत्व सोडले

    Shivraj Singh Chouhan : शिवराज यांच्यावर पाक गुप्तचर संस्था ISI कडून हल्ल्याचे इनपुट; गृह मंत्रालयाचे सुरक्षा वाढवण्याचे आदेश

    मोदींच्या भाजपचा नवा धक्का; ब्रेकिंग न्यूज आणि शोध पत्रकारितेचा पापड मोडला!!, भाजपमध्ये मोठ्या बदलाची चुणूक