TMC MP Kalyan Banerjee Controversial Comment : पश्चिम बंगालमधील निवडणुकांच्या काळातील राजकीय वक्तव्ये अजूनही सुरूच आहेत. आता तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी राज्यपाल जगदीप धनखड यांच्यावरून वादग्रस्त विधान केले आहे. कल्याण बॅनर्जी यांनी नारदा प्रकरणात तृणमूल सरकारचे मंत्री आणि आमदारांना अटक केल्यावरून राज्यपालाविषयी वादग्रस्त वक्तव्य केले. त्यानंतर राज्यपाल जगदीप धनखड यांनी स्तब्ध झाल्याचे म्हटले आहे. कारण तृणमूलचे खासदाराने आपल्या समर्थकांना त्यांच्याविरुद्ध पोलीस तक्रार नोंदवण्यास सांगितले आहे. राज्यपालांनी मात्र हे प्रकरण बंगालमधील जनतेच्या विवेकावर सोडले आहे. West Bengal Governor Jagdeep Dhankhar Reply On TMC MP Kalyan Banerjee Controversial Comment
विशेष प्रतिनिधी
कोलकाता : पश्चिम बंगालमधील निवडणुकांच्या काळातील राजकीय वक्तव्ये अजूनही सुरूच आहेत. आता तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी राज्यपाल जगदीप धनखड यांच्यावरून वादग्रस्त विधान केले आहे. कल्याण बॅनर्जी यांनी नारदा प्रकरणात तृणमूल सरकारचे मंत्री आणि आमदारांना अटक केल्यावरून राज्यपालाविषयी वादग्रस्त वक्तव्य केले. त्यानंतर राज्यपाल जगदीप धनखड यांनी स्तब्ध झाल्याचे म्हटले आहे. कारण तृणमूलचे खासदाराने आपल्या समर्थकांना त्यांच्याविरुद्ध पोलीस तक्रार नोंदवण्यास सांगितले आहे. राज्यपालांनी मात्र हे प्रकरण बंगालमधील जनतेच्या विवेकावर सोडले आहे.
पश्चिम बंगालच्या हुगळी येथे एका कार्यक्रमात भाग घेतल्यानंतर कल्याण बॅनर्जी यांनी राज्यपालांविषयी गरळ ओकली. खासदार म्हणाले की, राज्यपालपदावरून जेव्हा ते पायउतार होतील, तेव्हा त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला जाईल. येथेच खासदाराने त्यांना प्रेसिडेंसी जेलमध्ये टाकण्याचेही विधान केले. कल्याण बॅनर्जी यांनी असा दावा केला की, नर्मदा स्टिंग ऑपरेशन प्रकरणात टीएमसीचे तीन नेते फिरहद हकीम, सुब्रत मुखर्जी आणि मदन मित्रा आणि कोलकाताचे माजी महापौर सोव्हान चटर्जी यांना राज्यपालांच्या सांगण्यावरून अटक करण्यात आली आहे.
खा. कल्याण बॅनर्जी यांनी हुगळी येथे माध्यमांशी बोलताना म्हटले की, राज्यपालांविरोधात कोणतीही फौजदारी कारवाई होऊ शकत नाही याची मला जाणीव आहे, परंतु राज्यपालांनी जिथे हिंसाचार भडकावला तेथे संबंधित पोलिस ठाण्यात तक्रार करण्याची मी सर्वांना विनंती करत आहे. सोबतच ते असेही म्हणाले की, ते ज्या दिवशी राज्यपाल नसतील त्याचदिवशी त्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवल्या जातील. मग त्यांची रवानगी प्रेसिडेन्सी तुरुंगात करता येईल, येथेच त्यांनी तृणमूलच्या पाच नेत्यांना पाठविले होते.
West Bengal Governor Jagdeep Dhankhar Reply On TMC MP Kalyan Banerjee Controversial Comment
महत्त्वाच्या बातम्या
- Loan Fraud : देशातील बँकांची 5 लाख कोटींची कर्ज फसवणूक, SBI सोबत सर्वात जास्त 78 हजार कोटींचे फ्रॉड
- मुंबईत आमदाराच्या पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न, पुलावरून उडी मारणार तेवढ्यात…
- शेअर बाजाराने रचला इतिहास, मार्केट कॅप पहिल्यांदाच 3 ट्रिलियन डॉलरच्या पुढे, अवघ्या 7 वर्षांत दुप्पट
- धक्कादायक : चोरट्यांनी कोरोनाची लस समजून पोलिओचेच डोस पळवले, कल्याण ग्रामीणमधील घटना
- फायझर-मॉडर्नाचा थेट दिल्ली सरकारला लस देण्यास नकार, मात्र केंद्र सरकारशी डील करण्यास कंपन्या उत्सुक