• Download App
    राज्यपाल धनखड यांचा आसाम दौरा, राज्यपालांना पाहताच वृद्धाला अश्रू अनावर, सांगितले तृणमूलच्या गुंडांचे क्रौर्य । West Bengal Governor Jagdeep Dhankhar Meets Post Poll Violence-Hit People At Ranpagli Camp In Assam

    राज्यपाल धनखड यांचा आसाम दौरा, राज्यपालांना पाहताच वृद्धाला अश्रू अनावर, सांगितले तृणमूलच्या गुंडांचे क्रौर्य

    Governor Jagdeep Dhankhar : पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचारामुळे अनेक कुटुंबांनी आसाममध्ये आश्रय घेतला आहे. याच भागाचा पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी आज दौरा केला. आसामच्या अगोमणी भागात जाऊन पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. यादरम्यान एका वृद्ध व्यक्तीने राज्यपालांना बिलगून अश्रू ढाळत आपल्या वेदना व्यक्त केल्या. वृत्तसंस्था एएनआयने राज्यपालांच्या भेटीची काही छायाचित्रे शेअर केली आहेत, ज्यात एक वृद्ध राज्यपालांना बिलगून रडताना दिसत आहे. West Bengal Governor Jagdeep Dhankhar Meets Post Poll Violence-Hit People At Ranpagli Camp In Assam


    वृत्तसंस्था

    कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचारामुळे अनेक कुटुंबांनी आसाममध्ये आश्रय घेतला आहे. याच भागाचा पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी आज दौरा केला. आसामच्या अगोमणी भागात जाऊन पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. यादरम्यान एका वृद्ध व्यक्तीने राज्यपालांना बिलगून अश्रू ढाळत आपल्या वेदना व्यक्त केल्या. वृत्तसंस्था एएनआयने राज्यपालांच्या भेटीची काही छायाचित्रे शेअर केली आहेत, ज्यात एक वृद्ध राज्यपालांना बिलगून रडताना दिसत आहे. राज्यपालांना त्यांनी हिंसाचाराची कहाणी सांगत सांगितली. यावर राज्यपालांनी वृद्ध आणि पीडित कुटुंबांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

    2 मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून त्यांनी बंगालमध्ये आपली घरे सोडल्याचा दावा छावणीत राहणाऱ्या पीडितांनी केला आहे. ‘तृणमूल कॉंग्रेसच्या गुंडांनी’ त्यांच्या घरांची तोडफोड केली, असा आरोपही त्यांनी केला. पश्चिम बंगालच्या राज्यपालांनी कूचबिहार ते रणपागळीच्या शिबिरापर्यंत रस्त्याने प्रवास केला आणि निवडणुकीनंतरच्या हिंसाचारामुळे प्रभावित झालेल्या लोकांची भेट घेतली.

    बंगालसमोर दुहेरी आव्हान

    विशेष म्हणजे गुरुवारी राज्यपाल जगदीप धनखड हिंसाचाराची माहिती घेण्यासाठी कूचबिहार येथे पोहोचले, सीतलकुची येथे त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले आणि गो बॅकचे घोषणा देण्यात आल्या. निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचारामुळे बाधित झालेल्या जिल्ह्याचा दौरा करणारे राज्यपाल धनखड म्हणाले, “एकीकडे कोरोनाच्या आव्हानाला देश सामोरा जात आहे. पश्चिम बंगालसमोर दुहेरी आव्हान आहे. ते म्हणाले की, ही हिंसा केवळ याच आधारावर घडत आहे, कारण काही लोकांनी मर्जीने मतदानाचा निर्णय घेतला.

    राज्यपालांच्या दौर्‍यावरून राजकारण

    राज्यपालांच्या दौऱ्यावर मोठ्या प्रमाणात राजकारण झाल्याचे पाहायला मिळाले. मुख्यमंत्र्यांनी बुधवारी त्यांना एक पत्र लिहून म्हटले की, निवडणूकनंतर झालेल्या हिंसाचाराने प्रभावित झालेल्या कूचबिहार जिल्ह्यातील त्यांचा दौरा नियमांचे उल्लंघन आहे, तर धनखड यांनी घटनेनुसार आपली कर्तव्ये बजावत असल्याचे सांगून त्यांना प्रत्युत्तर दिले होते.

    West Bengal Governor Jagdeep Dhankhar Meets Post Poll Violence-Hit People At Ranpagli Camp In Assam

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र