वृत्तसंस्था
नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदावर चर्चेतल्या नावांपेक्षा वेगळे नाव पुढे आणत उमेदवारी देणाऱ्या भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतही असाच एक धक्का दिला आहे. प्रसिद्धी माध्यमांमध्ये चर्चेत असलेल्या नावांपेक्षा वेगळे असे नाव भाजपने पुढे आणले आहे. पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनगड (भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार असतील. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. West Bengal Governor Jagdeep Dhangad BJP – NDA Vice Presidential Candidate
नावे उधळून माध्यमे फेल
प्रसार माध्यमांमध्ये मुख्तार अब्बास नक्वी, अरिफ मोहम्मद खान, शिवराज सिंह चौहान आदी नावे चर्चेत आणली होती. अगदी व्यंकय्या नायडू यांना परत संधी देणार अशीही माध्यमांनी चर्चा घडवली होती. मात्र, जगदीप धनगड हे नाव प्रसार माध्यमांच्या चर्चेत नव्हते. भाजप आणि एनडीएने त्यांची उमेदवारी जाहीर करून द्रौपदी मुर्मू यांच्या पाठोपाठ नवे सरप्राईज दिले आहे.
हेच ते जगदीप धनगड (Jagdeep Dhankhar)
हेच ते जगदीप धनगड आहेत, की ज्यांनी पश्चिम बंगाल मध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजवटीत घटनात्मक पदावर राहून एक प्रकारे राजकीय पंगा घेतला. उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी त्यांची निवड करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीने ममता बॅनर्जी यांच्यापुढे राजकीय पेच टाकला आहे.
पाठिंब्याची प्रथा
सर्वसामान्यतः एखाद्या राज्याच्या राज्यपालांना वरिष्ठ पदावरची उमेदवारी दिली की संबंधित राज्याचे मुख्यमंत्री त्या राज्यपालांना वरिष्ठ पदाच्या निवडणुकीत पाठिंबा देतात, असा सर्वसाधारण संकेत आहे. बिहारच्या राज्यपाल पदावर असताना रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यावेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ताबडतोब त्यांच्या बाजूने आपला कौल दिला होता. ओरिसा राज्यातल्या द्रौपदी मुर्मू यांना भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने राष्ट्रपतीपदाचे उमेदवार केल्यानंतर ओरिसाचे मुख्यमंत्री आणि बिजू जनता दलाचे नेते नवीन पटनायक यांनी ताबडतोब त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. आपल्या राज्यातला नेता राष्ट्रपती अथवा उपराष्ट्रपती या सर्वोच्च पदावर विराजमान होताना भले तो विरोधी पक्षाचा असेल त्याला पाठिंबा दिला नाही तर वेगळा राजकीय संदेश जाऊ शकतो या राजकीय भीतीपोटी राज्यांचे मुख्यमंत्री अथवा नेते पाठिंबा देऊन मोकळे होतात.
ममता काय करणार?
जगदीप धनगड गेली 5 वर्षे पश्चिम बंगालचे राज्यपाल आहेत. त्यांचे जरी ममता बॅनर्जी यांच्याशी राजकीय दृष्ट्या पटत नसले तरी घटनात्मक पदावर असल्याने त्यांचे धनगड यांच्याशी किमान राजकीय संबंध निश्चित आहेत. या पार्श्वभूमीवर आता ममता बॅनर्जी यांची राजकीय कसोटी लागणार आहे त्या धनकवडे यांना पाठिंबा देतात की उपराष्ट्रपती पदासाठी विरोधकांचा सर्वसंमत उमेदवार उभा करतात आणि त्याला पाठिंबा देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मूळचे राजस्थानचे
जगदीप धनगड राजस्थानातून येतात. ते पश्चिम बंगालच्या राज्यपाल पदी विराजमान होण्यापूर्वी राज्यसभेचे सदस्य होते. त्यांनी सुप्रीम कोर्टात काही काळ वकिली देखील केली आहे. ते निष्णात घटनातज्ञ मानले जातात.
West Bengal Governor Jagdeep Dhangad BJP – NDA Vice Presidential Candidate
महत्वाच्या बातम्या
- छत्तीसगड मध्ये “एकनाथ शिंदे” : मुख्यमंत्र्यांना 4 पानी पत्र लिहून टी. एस. सिंगदेव यांचा ग्रामीण विकास पंचायतराज मंत्रीपदाचा राजीनामा!!
- महाराष्ट्रात “मनातल्या मुख्यमंत्र्यांमध्ये” आणखी एकाची भर!!
- राष्ट्रपती पदाची उमेदवारी मागे घेण्याचे यशवंत सिन्हा यांना प्रकाश आंबेडकरांचे आवाहन!!
- तेलंगणात इमामांचा पगार भागवण्यासाठी के. चंद्रशेखर राव यांनी दिले 17 कोटी रुपये!!