West Bengal Election Results 2021 : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी आज मतमोजणीला प्रारंभ झाला आहे. अडीच तासाच्या सुरुवातीच्या कलांमध्ये राज्यात टीएमसी आणि भाजपमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळाली. येथील सर्वात चुरशीची जागा नंदीग्राम मतदारसंघातील आहे. येथून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी निवडणूक लढवत आहेत आणि त्यांना एकेकाळचे त्यांचे सोबती शुभेंदू अधिकारींचे आव्हान आहे. West Bengal Election Results 2021: BJP candidate Suvendu Adhikari leads in Nandigram by 7,000 votes, Mamata Banerjee trailing
विशेष प्रतिनिधी
नंदिग्राम : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी आज मतमोजणीला प्रारंभ झाला आहे. अडीच तासाच्या सुरुवातीच्या कलांमध्ये राज्यात टीएमसी आणि भाजपमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळाली. येथील सर्वात चुरशीची जागा नंदीग्राम मतदारसंघातील आहे. येथून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी निवडणूक लढवत आहेत आणि त्यांना एकेकाळचे त्यांचे सोबती शुभेंदू अधिकारींचे आव्हान आहे.
सुरुवातीच्या अडीच तासाच्या (सकाळी 10.30 वाजेच्या) ट्रेन्डमध्ये ममता बॅनर्जी यांच्या पुढे भाजपचे उमेदवार शुभेंद्रू अधिकारी या जागेवर आघाडीवर आहेत. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार सकाळी 10.30 पर्यंत शुभेंदू अधिकारी 7287 मतांनी या जागेवर आघाडीवर होते. त्याचवेळी ममता बॅनर्जी 5790 मतांच्या तुलनेत खूपच मागे आहेत.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या आधी शुभेंदू अधिकारी टीएमसी सोडून भाजपमध्ये दाखल झाले होते. 2016च्या निवडणुकीत शुभेंदू अधिकारी यांनी या जागेवर डाव्या उमेदवाराचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता.
West Bengal Election Results 2021: BJP candidate Suvendu Adhikari leads in Nandigram by 7,000 votes, Mamata Banerjee trailing
महत्त्वाच्या बातम्या
- West Bengal Assembly Election 2021 Results Live : बंगालमधील या उमेदवारांकडे व मतदारसंघांकडे जरूर द्या लक्ष… तिथे आहेत लक्षवेधी लढती
- West bengal assembly elections 2021 results updates : ममता बॅनर्जी नंदीग्राममध्ये पिछाडीवर, सुवेंदू अधिकारी आघाडीवर
- Belgaum Bypoll Result : कोण मारणार बाजी ? मंगला अंगडी, सतीश जारकीहोळी की शुभम शेळके